पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/८एप्रिल
जामखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वाढणाऱ्या अवैध दारू धंद्यामुळे येथील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता तसेच आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखा व जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस स्टेशनच्या हद्दीतील साकत गावाचे शिवारातील जामखेड ते बीड रोडवर, हॉटेल योगिरा मध्ये अवैधरीत्या देशविदेशी दारू विक्री होत असल्याने स्थानिक गुन्हे शाखा व जामखेड पोलीसांच्या पथकाने काल दि. ७ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ६: ०० वाजताचे सुमारास संयुक्तपणे छापा मारून १२,२६५ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
त्यानुसार यातील फिर्यादी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस काॅन्स्टेबल रणजित पोपट जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी कृष्णा अंबादास राळेभात,( वय ३६), रा. मोरेवस्ती जामखेड याचे विरुध्द गु र नं.व कलम 172/2024 महाराष्ट दारूबंदी अधिनियम 65 ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक कोपनर हे करत आहेत.
दरम्यान दि. ५ एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर व खर्डा पोलीस स्टेशनच्या पथकाने खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील वेगवेगळ्या अश्या आठ ठिकाणी अवैध दारू विक्री करणाऱ्या हाॅटेल व गावठी बनावटीची दारू विक्री करणाऱ्या व्यवसाईकांवर धाडी टाकल्या होत्या. या दोन्ही पोलीस स्टेशनच्या हद्दीतील छापेमारीमुळे जामखेड तालुक्यातील अवैध दारू विक्री करणारे हॉटेल व धाबे चालकांचे धाबे दणाणले आहेत.
No comments:
Post a Comment