कर्जत-जामखेडसाठी पुरेशा एसटी बस आणि कर्जत व्यापारी संकुलाच्या वरच्या मजल्यास मान्यता देण्याची मागणी, आमदार रोहित पवार यांचे एसटी महामंडळाला पत्र - police warrant kharda

police warrant kharda

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

🚨 पोलिस वॉरंट न्यूजवर आपले सहर्ष स्वागत आहे 🚨 ताज्या घडामोडी | स्थानिक व राष्ट्रीय बातम्या | शैक्षणिक माहिती | सामाजिक प्रश्न आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा... धन्यवाद 🙏

  • Home
  • शिक्षण
  • राजकीय
  • रक्तदान
  • ठळक बातम्या
  • जामखेड शहर
  • खर्डा शहर
  • कर्जत-जामखेड
  • आरोग्य

Breaking

गुरुवार, २७ जून, २०२४

Home राजकीय बातम्या कर्जत-जामखेडसाठी पुरेशा एसटी बस आणि कर्जत व्यापारी संकुलाच्या वरच्या मजल्यास मान्यता देण्याची मागणी, आमदार रोहित पवार यांचे एसटी महामंडळाला पत्र

कर्जत-जामखेडसाठी पुरेशा एसटी बस आणि कर्जत व्यापारी संकुलाच्या वरच्या मजल्यास मान्यता देण्याची मागणी, आमदार रोहित पवार यांचे एसटी महामंडळाला पत्र

गुरुवार, जून २७, २०२४ राजकीय बातम्या,


पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/२७ जून

काम पूर्ण झालेला कर्जतचा एसटी डेपो सुरु करण्यात यावा आणि कर्जत व जामखेड तालुक्यासाठी पुरेशा नवीन एसटी बसेस आणि आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व एमडी माधव कुसेकर यांना दिले. 


कर्जतच्या एसटी डेपोचा प्रश्न गेल्या २५ वर्षांपासून भिजत पडला होता. याच विषयावर यापूर्वी अनेक निवडणुका झाल्या आणि जिंकल्या गेल्या परंतु डेपोचा प्रश्न मात्र जैसे थे होता. हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन आमदार रोहित पवार यांनी निवडणुकीच्या प्रचारात दिले होते. त्यानुसार आमदार होताच रोहित पवार यांनी पहिल्या तीन-चार महिन्यातच महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून कर्जतच्या एसटी डेपोला मंजुरी आणली आणि सद्यस्थितीत या डेपोचे काम पूर्ण झाले आहे. गेल्या दिड-दोन वर्षांपासून हे काम पूर्ण झाले असले तरी सरकार बदलल्यामुळे श्रेयवादामुळे हा डेपो सुरु केला जात नाही. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. याबाबत आमदार रोहित पवार यांनी यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेऊन हा डेपो सुरु करण्याची मागणी केली होती. आज पुन्हा त्यांनी एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचे निवेदन देऊन हा डेपो तातडीने सुरु करण्याची आणि डेपोसाठी आवश्यक मनुष्यबळ व एसटी बसेस नव्याने उपलब्ध करुन देण्याबाबत एसटी महामंडळाचे जिल्हा नियंत्रक व आगार व्यवस्थापक यांनी सादर केलेला प्रस्ताव मंजूर करण्याची आग्रही मागणी आमदार रोहित पवार यांनी केली. 

जामखेड बस स्थानकासाठीही पुरेशा बस नाहीत. सध्या कार्यरत असलेल्या बसेस या जुन्या झाल्या असल्याने बिघाड होण्याचे प्रमाणही मोठे आहे. प्रवाशांची संख्या वाढत असताना पुरेशा बसअभावी त्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे नागरिक, विद्यार्थी, व्यावसायिक या सर्वांनाच अनेक अडचणींना समोरे जावे लागते. जामखेड बस स्थानकासाठी नवीन बसेसचा प्रस्तावही शासन स्तरावर प्रस्तावित करण्यात आला असून तोही मंजूर करण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी एसटी महामंडळाकडे केली आहे.

दरम्यान, कर्जत एसटी आगार बांधकाम आणि व्यापारी संकुलाच्या वरच्या मजल्याच्या बांधकामास शासन स्तरावरून मान्यता मिळालेली असून हे बांधकाम सुरू आहे. मात्र या बांधकामासाठीची निविदा मूळ निविदा रकमेच्या दरापेक्षा कमी दराने प्राप्त झाल्याने काही रक्कम शिल्लक आहे. या रकमेतून कर्जत आगारा अंतर्गत बांधकाम होत असलेल्या व्यापारी संकुलाच्या वरच्या मजल्याचे बांधकाम झाल्यास या ठिकाणच्या व्यावसायिकांना व्यवसासाठी हक्काची जागा मिळणार आहे. शिवाय एसटी महामंडळालाही यातून उत्पन्न मिळेल आणि आगाराच्या अवतीभोवती होत असलेले अतिक्रमण थांबून वाहतूक व रहदारीचाही प्रश्न कायमचा सुटणार आहे. याबाबतही आमदार रोहित पवार यांनी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि तसे पत्रही दिले. 
…..

कोट

‘‘कर्जतच्या एसटी डेपोबाबत निवडणुकीत दिलेला शब्द आमदार झाल्याबरोबर पहिल्या ३-४ महिन्यातच पूर्ण केला आणि आता हे काम शंभर टक्के पूर्ण झालंय. त्यामुळे एसटी डेपो सुरु करणं आवश्यक आहे. या डेपोसह जामखेडसाठीही तातडीने पुरेशा बस देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती आणि आता याचसंदर्भात एसटी महामंडळाचे एडी कुसेकर साहेब यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. याबाबतचे सर्व प्रस्ताव पूर्ण असल्याने ते लवकरच मंजूर करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. येत्या २१ जुलैपर्यंत कर्जतचा डेपो सुरु केला नाही आणि पुरेशा बसेस मिळाल्या नाहीत तर नागरिकांच्या सहकार्याने मोठं जनआंदोलन उभं केलं जाईल.’’

रोहित पवार
(आमदार कर्जत-जामखेड)
Tags # राजकीय बातम्या
  • Tweet
  • Share
  • Pin it
  • Comment
  • Whatsapp
Author Image

About Unknown

राजकीय बातम्या
Posted at गुरुवार, जून २७, २०२४
यास ईमेल कराहेब्लॉगकरा!X वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा
Labels राजकीय बातम्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)
श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

श्वेता बापूसाहेब गायकवाड संपादिका-सा.पोलीस वारंट मो नंबर-९९७०५२९६९७

Blogger द्वारे प्रायोजित.

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क

संपादिका -श्वेता बापूसाहेब गायकवाड-9970529697 / कार्यकारी संपादक- आशुतोष गायकवाड- 8888785253,

Popular Posts

  • चाकूचा धाक दाखवून कामगाराची लूट; दोन सराईत लुटारूंना पोलिसांच्या बेड्या
    जामखेड प्रतिनिधी –21ऑक्टोबर चाकूचा धाक दाखवून एका कामगाराच्या फोनपे खात्यातून ८ हजार ५० रुपये हस्तांतरित करून त्याला लुटणाऱ्या...
  • लोणीचे आदर्श सरपंच रघुनाथ परकड आता पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात,राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त; भाजपातून साकत गणातून उमेदवारीसाठी इच्छुक
    जामखेड प्रतिनिधी/१९ ऑक्टोबर२०२५ जामखेड तालुक्यातील लोणी ग्रामपंचायतीचे युवा आणि विकासाभिमुख सरपंच रघुनाथ पंढरीनाथ परकड हे आगा...
  • मोहरी तलाव दुरुस्तीवरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने; श्रेयवादाच्या वादानं रंगला खर्ड्यात कलगीतुरा!
    जामखेड प्रतिनिधी/ 22ऑक्टोबर अतिवृष्टीमुळे गंभीररीत्या बाधित झालेल्या मोहरी लघु पाटबंधारे तलावाच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात झा...
  • समाजसेवेचा दीप उजळला — पै. सागर भाऊ टकले यांच्याकडून वॉर्ड क्र.11 मधील महिलांना दिवाळीनिमित्त किराणा किटचे वाटप,नगरसेवक असावा तर सागर भाऊ सारखा!” – दिवाळीत महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला , महिलांनी केलं आभार प्रदर्शन
    जामखेड प्रतिनधी/२१ऑक्टोबर२०२५ जामखेड 11 नंबर वॉर्डमधील नगरपरिषद निवडणुकीचे इच्छुक उमेदवार सामाजिक कार्यकर्ते पै.सागर भाऊ टकले य...
  • खर्डा येथे पिकअपमध्ये कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
    खर्डा,प्रारतिनधी /17जून2025 जामखेड तालुक्यातील खर्डा येथील न्यु इंग्लिश स्कूलजवळ आज दिनांक 17 जून, 2025 रोजी दुपारी 1:10 वाजता आ...
  • “‘माझ्या तब्येतीपेक्षा गावाच्या पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा’ — भाजपा नेते रवींद्र सुरवसे यांच्या संवेदनशीलतेला सभापती राम शिंदेंचा तत्काळ प्रतिसाद,मोहरी तलाव दुरुस्तीचा मार्ग मोकळा; सभापती शिंदेंकडून जलसंपदा विभागाला तातडीचे आदेश
    खर्डा प्रतिनिधी / १६ ऑक्टोबर अतिवृष्टीमुळे भराव वाहून गेलेल्या मोहरी तलावाचा ज्वलंत प्रश्न आता मार्गी लागणार आहे. भाजपा नेते व ...
  • जामखेड तालुक्यातील १६ वर्षांच्या मुलीच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणाचा तपास; प्रेमीयुगुलीच्या आत्महत्येची घटना उघडकीस..पुण्यातील खडकवासला धरणाजवळ दोघांचे मृतदेह आढळले
    जामखेड प्रतिनधी/11जुलै2025 महादेव नगर, मांजरी येथील एका १६ वर्षीय मुलीच्या बेपत्ता होण्याच्या तक्रारीनंतर केलेल्या शोधात आज सक...
  • खर्डा येथील पारधी वस्ती नागरिकांची त्वरित सुविधा उपलब्धतेसाठी ग्रामपंचायतीला निवेदन नागरी सुविधा नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा – पारधी वस्तीचे रहिवासी
    खर्डा, १८ जून 2025 जामखेड तालुक्यातील खर्डा शहरातील वार्ड क्रमांक १ मधील पारधी वस्तीतील नागरिक आपल्या त्वरित नागरी सुविधांसाठी...
  • दि .18 जूनपर्यंत प्रधानमंत्री आवास योजना ऑनलाइन सर्वेमध्ये सहभाग घ्या ; बाजीराव गोपाळघरे यांचे जामखेड तालुक्यातील नागरिकांना आवाहन
    जामखेड प्रतिनधी/१५जून २०२५ जामखेड तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये, घरकुला पासून वंचित असलेल्या नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेस...
  • अहिल्यानगर-सोलापूर मार्गावर स्थानिकांना टोलमाफी आणि अंडरपास/ओव्हरपासच्या मागणीची केंद्राकडून दखल,आमदार रोहित पवार यांनी केली होती मागणी
    पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/१३सप्टेंबर अहिल्यानगर-करमाळा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या स्थानिकांना टोलमाफी आणि सुरक्षिततेच्या दृष्...

Popular Posts

खर्डा शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती विविध उपक्रमांनी साजरी

चाकूचा धाक दाखवून कामगाराची लूट; दोन सराईत लुटारूंना पोलिसांच्या बेड्या

लोणीचे आदर्श सरपंच रघुनाथ परकड आता पंचायत समितीच्या निवडणुकीच्या रिंगणात,राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त; भाजपातून साकत गणातून उमेदवारीसाठी इच्छुक

धक्कादायक हत्या: चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीची कुऱ्हाडीने सपासप वार करत केली हत्या; नंतर आत्महत्येचा प्रयत्न

जामखेडच्या खताच्या दुकानात मोठी चोरी, ३ लाखांचा माल गायब

धक्कादायक: “लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार;मुलगी झाल्यावर आरोपीचा जबाबदारीला नकार ; खर्डा शहर हादरले” आरोपीविरुद्ध पोलिसात गंभीर गुन्हा दाखल

आ. रोहित पवार यांच्याकडून स्वखर्चातून मोहरी तलावाच्या दुरुस्तीची तयारी, कुकडी व सीना कालवा आणि बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी जलसंपदा विभागाकडे निधीची मागणी,जलसपंदा विभागाने दिले कार्यवाहीचे आदेश

जिल्ह्यातील अवैध धंद्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांचा आळा – संगमनेर-मिरजगाव-लोणी परिसरात अवैध धंद्यावर धडक!दोन दिवसांत 9 ठिकाणी छापे – 12 आरोपी अटक, 4.25 लाखांचा मुद्देमाल जप्त

खर्डा परिसरात अनोळखी वृद्ध महिलेचा मृतदेह आढळला– रहस्यमय घटनेचा तपास सुरू, परिसरात एकच खळबळ

मोहरी तलाव दुरुस्तीवरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने; श्रेयवादाच्या वादानं रंगला खर्ड्यात कलगीतुरा!

Labels

  • अरणगाव (2)
  • अहमदनगर (8)
  • अहमदनगर बातम्या (1)
  • अहमदनगर पोलीस (1)
  • अहमदनगर पोलीस स्टेशन (2)
  • अहमदनगर शहर (3)
  • अहिल्यानगर पोलीस (1)
  • आरोग्य (1)
  • आहिल्यानगर पोलीस (2)
  • आहिल्यानगर पोलीस स्टेशन (1)
  • आहिल्यानगर बातम्या (1)
  • कर्जत (2)
  • कर्जत -जामखेड (1)
  • कर्जत पोलीस स्टेशन (1)
  • कर्जत-जामखेड (24)
  • केज पोलीस स्टेशन (1)
  • क्राईम (18)
  • क्राईम न्यूज (1)
  • क्राईम बातम्या (115)
  • खर्डा (1)
  • खर्डा ग्रामपंचायत (1)
  • खर्डा पोलीस स्टेशन (128)
  • खर्डा प्रतिनधी (1)
  • खर्डा शहर (331)
  • खर्डा शहर ठळक (1)
  • चोंडी (2)
  • चौंडी (1)
  • जवळा (1)
  • जातेगाव (2)
  • जामखेड (3)
  • जामखेड ठळक (2)
  • जामखेड पोलीस स्टेशन (176)
  • जामखेड शहर (175)
  • जामखेड शहर बातम्या (1)
  • जिल्हाधिकारी बातम्या (1)
  • ठळक बातम्या (429)
  • डोणगाव बातम्या (1)
  • तेलंगशी बातम्या (1)
  • थळक बातम्या (1)
  • दिघोळ बातम्या (1)
  • दुःखद बातम्या (11)
  • धानोरा ग्रामपंचायत (1)
  • नगर (1)
  • नगर पोलीस स्टेशन (1)
  • नायगाव (2)
  • नेवासा पोलीस स्टेशन (11)
  • नेवासा बातम्या (2)
  • नेवासा शहर (2)
  • पर्यावरण (1)
  • पोलीस स्टेशन (1)
  • बांधखडक (2)
  • बांधखडक बातम्या (2)
  • बातम्या (8)
  • बावी (2)
  • बाळगव्हाण (3)
  • बीड क्राईम बातम्या (1)
  • बीड पोलीस स्टेशन (5)
  • बीड शहर (2)
  • भूम बातम्या (1)
  • मिरजगाव पोलीस स्टेशन (2)
  • मोहरी बातम्या (1)
  • रक्तदान (1)
  • राजकीय (86)
  • राजकीय ठळक (6)
  • राजकीय ठळक बातम्या (1)
  • राजकीय बातम्या (362)
  • लोणी ग्रामपंचायत (1)
  • शहर ठळक बातम्या (3)
  • शालेय (5)
  • शालेय बातम्या (1)
  • शिर्डी पोलीस स्टेशन (2)
  • शिर्डी बातम्या (1)
  • शिक्षण (1)
  • शैक्षणिक (2)
  • शैक्षणिक बातम्या (45)
  • साकत (6)
  • साकत बातम्या (1)
  • सातेफळ (1)
  • सामजिक बातम्या (33)
  • सामाजिक (23)
  • सामाजिक ठळक (1)
  • सामाजिक बातम्या (104)
  • सोनेगाव (7)
  • सोलापूर ठळक बातम्या (1)
  • स्थानिक गुन्हे शाखा (33)
  • स्थानिक गुन्हे शाखा नगर (1)
  • स्थानीक गुन्हे शाखा (3)
  • हळगाव (2)
  • dysp संतोष खाड़े (1)
  • Vote (1)

पोलीस वारंट समाजातील प्रत्येक घटकांच्या घडामोडी, कला आणि साहित्य क्षेत्रातील उत्तुंग भरारी, खेळ आणि क्रीडा विश्वातील यशस्वी दौड, शिक्षण व शैक्षणिक वाटचाल, राजकारण आणि सामाजिक माहिती, गुन्हेगार आणि समाजातील विकृती, जनजागृती आणि जनसामान्यांच्या भावना आपल्या लेख, कथा, काव्य, गोष्टी, व बातम्यांच्या माध्यमातून समाजापुढे मांडत असते.

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

POLICE WARRANT ©2023 All rights reserved Developed By DIGITAL FLY KHARDA

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *