काल दि. २ सप्टेंबर रोजी रात्री ११: ३० वाजेच्या सुमारास सौताडा घाटत येथे मंदिराच्या जवळ एक सिमेंट ट्रक व व्हॅगनार कार यांचा खड्ड्यामुळे अपघात झाला यात व्हॅगनार कारवर सिमेंटची गाडी पडली. त्यामुळे कार चालक महेश विद्याधर देशमुख (वय ४४) रा. हेतब्बल ३ तास अडकून पडले होते. मिळालेल्या माहितीनुसार सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी आपली रुग्णवाहिका घेऊन सौताडा घाटाकडे धाव घेतली. तब्बल तीन तासानंतर गाडीमध्ये अडकलेल्या जखमीस जेसीबी व क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात आले आहे.सविस्तर असे की दि. २ सप्टेंबर रोजी रात्री ११ : ३० वाजताचे सुमारास सिमेंटचा ट्रक व बीड येथील महेश विद्यासागर देशमुख (वय 45) , पत्नी सौ. मंजू व मुलगा त्रिविद असे कार क्रमांक MH 12-SE-8161 यामध्ये हे कुटुंब अडकले होते. यावेळी एका जवानाच्या मदतीने गाडीच्या काचा फोडून मुलगा आणि पत्नी यांना जणांना बाहेर काढले, महेश देशमुख यांचे दोन्ही पाय दोन्ही गाडीच्या मध्ये अडकल्याने त्यांना सर्वांनी मिळून तीन तास शर्तीच्या प्रयत्नाने त्यांना बाहेर काढले व जामखेड येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. डोक्याला मार लागला असून किरकोळ जखमा सोडून कुठेही फॅक्चर नाही. सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या समवेत, प्रकाश पोळ बी.डि.ओ., पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, युवराज ढेरे,
ग्रामसेवक,पी.एस.आय. राजेंद्र थोरात, अविनाश ढेरे, संदीप आजबे, संदीप राऊत, अजिनाथ जाधव, दत्ता बेलेकर ,रमेश आजबे, विनोद बेदमुथा, निखिल कुमकर , गोकुळ जाधव ,विशाल ढवळे ,दत्ता साळुंखे, विशाल खैरे, महेश सोनवणे, डॉ. सुनील गंडाळ,महेश मोळकर, राहुल अंधारे, अरुण पवार, वसीम सय्यद सचिन पिरगळ, ध बाबू शिंदे यांच्या क्रेनच्या साह्याने जेसीबीच्या साह्याने दोन्ही गाड्या बाजूला काढून कार मधील अडकलेली व्यक्ती दरवाजे तोडून शाबूत बाहेर काढले यावेळी देशमुख यांच्या पत्नी यांना रडू आवडत नव्हते त्यांच्यासमोर तीन तास त्यांचे पती गाडीत अडकले होते पाहणाऱ्याच्या अंगावर शहारे फुटत होते परंतु जामखेड करानी दाखवून दिले हम भी कुछ कम नही प्रत्येकाने प्रत्येकाच्या परीने मदत करून त्यांना बाजूला काढले रात्री दीड वाजता त्यांना दवाखान्यात दाखल केले असता कुठेही फॅक्चर नाही असे डॉ. भरत दारकुंडे यांनी सांगितले. आ. रोहितदादा पवार यांची यंत्रणा सुद्धा घटनास्थळी दाखल होऊन काम करत होती.
No comments:
Post a Comment