खर्डा प्रतिनिधी : ३ सप्टेंबर
जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील लोणी येथील फिर्यादी अन्सार नवाब पठाण (वय ३० वर्ष)
हे आरोपी जयराम खामकर यांचे दुकाना समोर असताना यातील आरोपी शहाजी शिवाजी परकड (वय २९ वर्ष) ने तु डी.पी. कस काय आणली, तिचा पाठ पुरावा आम्ही केला आहे. सरपंच आमचा आहे, असे म्हणुन घाण घाण शिवीगाळ करून गचांडी धरून जिवे मारण्याची धमकी दिली आहे. याबाबत फिर्यादी अन्सार नवाब रा. लोणी ता. जामखेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी शहाजी शिवाजी परकड वय 29 वर्ष धंदा शेती रा. परकडवस्ती, लोणी यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान
तु गावामधील डी.पी. का बसवली तु हे काम करायचे नाही, असे म्हणत शिविगाळ करणाऱ्या अन्सार नवाब पठाण यांचेवरही गुन्हा दाखल आला आहे.
खर्डा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लोणी येथील जयराम खामकर हे आपल्या दुकानामध्ये बसलेले असताना, तु गावामधील डी.पी. का बसवली तु हे काम करायचे नाही, असे म्हणुन जयराम खामकर यांना घाण घाण शिवीगाळ करून चापटाने मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली आहे. शहाजी शिवाजी परकड वय 29 वर्ष धंदा शेती रा. परकडवस्ती, लोणी यांनी दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी अन्सार नवाब पठाण रा. लोणी एनसी. दाखल करण्यात आली आहे.
ही घटना दि. २ सप्टेंबर रोजी सकाळी ९: ३० वाजताचे सुमारास जयराम खामकर याचे जनरल स्टोअर दुकना समोर, लोणी ता. जामखेड येथे घडली आहे.
याबाबत दोन्ही आरोपींविरूध्द प्रतिबंधक कारवाई करत आसल्याची माहिती पोलीसांकडून देण्यात आली आहे.
दोन्ही परस्परविरोधी गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्टेबल रईस सय्यद हे करत आहेत.
No comments:
Post a Comment