खर्डा प्रतिनिधी ३सप्टेंबर
खर्डा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लोणी येथील जयराम खामकर हे आपल्या दुकानामध्ये बसलेले असताना, तु गावामधील डी.पी. का बसवली तु हे काम करायचे नाही, असे म्हणुन जयराम खामकर यांना घाण घाण शिवीगाळ करून चापटाने मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली आहे. शहाजी शिवाजी परकड वय 29 वर्ष धंदा शेती रा. परकडवस्ती, लोणी यांनी दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी अन्सार नवाब पठाण रा. लोणी एनसी. दाखल करण्यात आली आहे.
ही घटना दि.02/09/2022 रोजी सकाळी 09.30 वा. सुमारास जयराम खामकर याचे जनरल स्टोअर दुकना समोर, लोणी ता. जामखेड येथे घडली आहे. याबाबत आरोपी विरूध्द प्रतिबंधक कारवाई करत आसल्याची माहिती पोलीसांकडून देण्यात आली आहे.
पुढील तपास पोलीस हेडकॉन्टेबल रईस सय्यद हे करत आहेत.
No comments:
Post a Comment