खर्डा प्रतिनिधी : ३ सप्टेंबर
खर्डा पोलीस स्टेशनच्या जवळच असलेल्या बसस्थानकातून
चोरट्यांनी गर्दीचा व प्रवाशांच्या असावधानतेचा फायदा घेत बसमध्ये चढताना वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास केले. पोलीस स्टेशनच्या जवळच ही घटना घडल्याने चोरटय़ांनी पोलीसांनाच चॅलेंज केल्याची चर्चा सुरू आहे.
जामखेड तालुक्यातील खर्डा बसस्थानक परिसरात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने अज्ञाताने लंपास केले. २८ ऑगस्टला पूनम बालाजी पाटील ( वय २६ , रा . माणकेश्वर , ता . भूम , जि . उस्मानाबाद ) या महिलेचे सोन्याचे गंठण, कानातील झुमके, हातातील अंगठी, गळ्यातील सोनसाखळी असा ३० ग्रॅमचे ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
याबरोबरच मालन सोमनाथ तागड ( वय ७० , रा . दिघोळ ) ही महिला ३१ ऑगस्टला खर्डा बसस्थानक येथे आली होती . या महिलेच्या गळ्यातील मनी मंगळसूत्र त्यात एक पान व दोन डोरले , २ ९९ सोन्याचे मनी असे २० ग्रॅमचे अंदाजे ३० हजार रुपये किमतीचे सोने चोरट्यांनी लंपास केले . याबाबत दोन वेगवेगळ्या फिर्यादीवरून खर्डा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटय़ांविरुद्ध दोन गुन्हे दाखल झाले आहे.
खर्डा पोलीस स्टेशन हे बसस्थानकाजवळच असताना चोरटय़ांनी केलेले धाडस हे पोलीसांना चॅलेंजच म्हणावे लागेल.
No comments:
Post a Comment