खर्डा प्रतिनिधी :२सप्टेंबर
खर्डा येथील सिताराम बाबा व गीते बाबा गडाच्या विकास कामाला लावलेली स्थगिती लवकरच हटउन तेथील कामे सुरू केले जातील असा दावा आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला.
ते खर्डा येथे सिताराम बाबा गडावर अखंड हरिनाम सप्ताह निमित्त काल्याच्या कीर्तनाच्या सांगता समारोप प्रसंगी बोलत होते.
यावेळी ह भ प रामकृष्ण रंधवे, ह भ प हरीआबा गीते, सरपंच आसाराम गोपाळघरे, प्राध्यापक मधुकर राळेभात, विजयसिंह गोलेकर, रवींद्र सुरवसे, रमेश आजबे, उपसरपंच श्रीकांत लोखंडे, युवराज गोलेकर इत्यादी उपस्थित होते.
ते बोलताना पुढे म्हणाले की श्री संत सिताराम बाबा गडासाठी तीन कोटी रुपये व श्री संत गीते बाबा यांच्या गडाच्या कामासाठी सहा कोटी असे एकूण नऊ कोटी रुपये मंजूर केले आहेत मात्र या कामांना नवीन सरकारने स्थगिती दिली आहे, तसे पाहिले असता देवस्थानच्या कामाला कोणी स्थगिती देऊ शकत नाही व ही स्थगिती लवकरच उठवली जाईल आणि भाविकाच्या या दोन्ही गडावर श्रद्धेच्या रूपाने मोठी नाळ जोडली गेली आहे,ही विकास कामे पुढील काळात सुरू होतील असा विश्वास आमदार पवार यांनी व्यक्त केला.
श्री क्षेत्र सिद्धाराम गडाच्या वतीने स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यश मिळविलेल्या गुणवंतांचा व उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव यावेळी करण्यात आला. सिताराम गडाची मताधिपती महालिंग महाराज नगरे यांच्या कार्याचे ही कौतुक यावेळी करण्यात आले. तसेच पंढरपूर येथील श्री संत गीते बाबा यांच्या गडाला आमदार रोहित पवार यांनी दहा लाख रुपयांचा निधी देण्याचे जाहीर केले त्याचबरोबर सिताराम बाबा गड चौक ते खर्डा किल्ला हा चार पदरी रस्ता होणार असून यामध्ये रस्ता दुभाजक मध्ये झाडे व लाईटची व्यवस्था करण्यात करण्याकरिता 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून लवकरच रस्त्याचे काम सुरू होईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता गडाची मताधिपती महालिंग महाराजांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली, या कार्यक्रमास पन्नास ते साठ हजार भाविकांचा जनसमुदाय उपस्थित होता.
याप्रसंगी चेअरमन मुकुंद गोलेकर, शिवाजी भोसले, चंद्रकांत गोलेकर, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गोलेकर, महालिंग कोरे, वैजीनाथ पाटील,आसाराम साबळे,हरी गोलेकर, राम भोसले, बाळू गोलेकर,उद्धव ढेरे,मोहन सकट, पोपट भूते इत्यादी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment