पोलीस वारंट न्यूज नेटवर्क- १२ ऑक्टोबर
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे खर्डा ग्रामपंचायत अंतर्गत वार्ड क्रमांक दोन मधील दलित वस्तीतील मातंग व गारुडी समाज येथे अनेक कुटुंब राहत आहेत .तसेच या गल्लीमधील अंतर्गत गटारीचे पाणी चेंबर मध्ये अडकून बाहेर पडत आहे त्यातच त्या शेजारी खर्डा पोलीस स्टेशन मध्ये ही मागील बाजूने पाणी जात असून या घाणीच्या पाण्यामुळे येथील लोकांचे व तिथे राहणाऱ्या समाजाचे लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे, तरी खर्डा ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी तातडीने लक्ष घालून या तुंबलेल्या गटारीचे काम लवकरात लवकर सुरू करावे व अंतर्गत गटारीचे पाणी पुढे वाहते करावे अशी मागणी शिवपट्टण विकास युवा मंचाच्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन ग्रामपंचायत कर्मचारी शहाबाज शेख यांनी स्वीकारले आहे.
यावेळी निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते बबलू सुरवसे, गणेश ढगे, धीरज कसबे, बंटी सकट, किशोर बोडके, विश्वास सकट, स्वप्निल सकट, नीरज कसबे, रोहित बोडके, कृष्णा काळे, आकाश खेडकर, सोहन लोंढे, करण बोडके, मुकेश डोके इत्यादी सह कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवपट्टण विकास युवा मंचच्या वतीने निवेदन स्वाकरून लगेच तातडीने निर्णय घेऊन सरपंच संजीवनी पाटील यांनी पाहणी करून दिलेल्या गटारीचे काम तातडीने कर्मचारी पाठवून कामाची सुरुवात केली आहे .
No comments:
Post a Comment