पोलीस वारंट न्यूज नेटवर्क -१३ ऑक्टोबर
भारतीय जनता पक्षाचे युवा नेते बाजीराव गोपाळघरे यांचा आज वाढदिवस असल्याकारणाने आज १३ ऑक्टोबर रोजी खर्डा येथे विविध ठिकाणी मोठ्या आनंदाच्या वातावरणात व अनेक मित्र मंडळाकडून वाढदिवस साजरा करण्यात आला .
खर्डा व पंचक्रोशीतील जनतेच्या व्यक्तिगत व सार्वजनिक कामांसाठी व युवांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच अग्रेसर असणारे धडाडीचे व्यक्तिमत्व म्हणून बाजीराव गोपाळघरे यांची ओळख आहे. याच पार्श्वभूमीवर आज दिनांक १३ ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात झालेल्या वाढदिवसा वरून त्यांची लोकप्रियता पण दिसून येत आहे , बाजीराव गोपाळघरे हे पंचायत समिती निवडणूकीला भाजपाकडून इच्छुक उमेदवार आहेत . व त्यांना भावी पंचायत समिती सदस्य म्हणून पण ओळखले जात आहे. तसेच आज त्यांचा वाढदिवस असल्याकारणाने त्यांच्या वर जणतेकडुन शुभेच्छांचा मोठा वर्षाव झाला आहे
तसेच खर्डा येथील पत्रकारांच्या वतीनेही बाजीराव गोपाळघरे यांचा वाढदिवस अगदी खेळीमेळीच्या वातावरणात साजरा करण्यात आला आहे . व यावेळी त्यांचा सत्कार करून सर्व पत्रकारांकडून शुभेच्छा देण्यात आल्या . यावेळी उपस्थित पत्रकार संतोष थोरात, श्वेता गायकवाड ,अनिल धोत्रे, आशुतोष गायकवाड ,धनसिंग साळुंखे ,मनोज देशमुख उपस्थित होते
No comments:
Post a Comment