पोलीस वारंट न्यूज नेटवर्क -१४ ऑक्टोबर
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेबाबत अफवा उठवली जात आहे. या अफवांवर विश्वास ठेवू नका, खर्डा येथील ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित आहेत. ज्यांचा विश्वास नसेल ते आपल्या ठेवी कधीही घेवून जावू शकतात. फक्त गर्दी करू नका आणि शिस्तीमध्ये घेवून जावा असे आवाहन ज्ञानराधा बँकेचे शाखाधिकारी व्ही. बी. सापटे यांनी केले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की तिरुमला उद्योग समुहाच्या तपासणीसाठी आयकर विभागाचे काही अधिकारी तपासणी करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेच्या बाबत बाहेर काही अफवा पसरविण्याचे काम सुरू आहे. आयकर विभागाच्या या तपासणी नियमित असतात. या तपासणीचा आणि उठवलेल्या अफवांचा संबंध लावून ठेवीदार आपल्या ठेवी काढून घेण्यासाठी आज दिवसभर बॅंकसमोर मोठी गर्दी करत आहेत. तरी अशा अफवांवर विश्वास ठेवू नका ज्ञानराधा मल्टीस्टेट मधील सर्व ठेवी सुरक्षित आहे असे बँक शाखा अधिकारी व्ही.बी .सापटे यांनी नागरिकांना आव्हान केले आहे.
चौकट
सर्व ज्ञानराधा पतसंस्था ग्राहकांना विनंती की, कुटेग्रुप कंपनीच्या आयकर विभगाची तपासणी सुरू आहे. पण कुटे ग्रुप व ज्ञानराधा या दोन्ही वेगळ्या संस्था आहेत. या तपासणीमुळे ज्ञानराधाच्या ग्राहकांनी घाबरून जाऊ नये. ज्ञानराधामधील प्रत्येकाचा पैसा हा सुरक्षित आहे.व जर आपल्याला काही शंका असतील तर आपल्या ठेवी काढून घेण्यासाठी गर्दी करू नका ,शिस्तीमध्ये काढून घ्या आणि प्रशासनाला सहकार्य करा आपल्या ठेवी काढून घेताना कोणतीही आडकाठी मध्ये येणार नाही .
आजवर जे तुम्ही प्रेम दिलं विश्वास सहकार्य ज्ञानराधाला खर्डेकरांनी केलं तसेच पुढे ही ठेवावा. असा विश्वास बँकेची शाखा अधिकारी व्ही. बी. सापटे यांनी दिला
No comments:
Post a Comment