पोलीस वारंट न्यूज नेटवर्क -१७ ऑक्टोबर
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी चौंडेश्वरी नवरात्र उत्सव मंडळाचे आयोजित केलेला कार्यक्रम म्हणजे होम मिनिस्टर हा सर्वात लोकप्रिय असा कार्यक्रम मंडळाच्या वतीने घेण्यात आला होता या कार्यक्रमात महिलांनी मोठा प्रतिसाद दिला सर्वांनी कार्यक्रमात सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढविली या कार्यक्रमांमध्ये विशेष म्हणजे ६५ ते ७० वर्षापर्यंतच्या आजीबाईंनी सुद्धा कार्यक्रमात आपली हजेरी लावून सहभाग घेतला
यावेळी कार्यक्रमाचे होम मिनिस्टर सिनेस्टार संदीप जाधव यांनी विविध प्रकारचे खेळ घेऊन पहिले दुसरे व तिसरे असे विजेते क्रमांक काढले .या क्रमांकात विजेते म्हणून पहिला क्रमांक पटकवला सौ .प्रियंका अमित बीडकर , तर द्वितीय क्रमांक सौ.ज्योती हरिदास कांबळे तर तिसरा क्रमांक सौ.कल्याणी अमोल तंटक यांनी यावेळी
ह्या तीनही विजेत्यांना ग्रामपंचायत सदस्या सौ .रोहिणी प्रकाश गोलेकर व सौ शितल सुहास गोलेकर ,यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
तसेच या कार्यक्रमात ज्या ज्या महिलांनी सहभाग नोंदवला त्या महिलांना सरपंच सौ. संजीवनी पाटील यांच्याकडून डस्टबिनचे (कचऱ्याचा डब्बा) वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य , व मंडळाचे सर्व कार्यकर्ते , व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
No comments:
Post a Comment