पोलीस वारंट न्यूज नेटवर्क -१९ ऑक्टोबर
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील तब्बल सहा कोटी रुपये खर्च करून निर्माण केलेली व पंचक्रोशीतील २० च्या वर गावांच्या आरोग्यासाठी लाभदायी ठरणारे खर्डा प्राथमिक आरोग्य केंद्राची ईमारत तब्बल एक वर्षापासून उद्घाटना अभावी प्रतीक्षेत आहे . इमारत "असून अडचण आणि नसून खोळंबा "अशी परिस्थिती सध्या झाली आहे.
जुन्या ईमारत प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये औषधांचा मोठा तूटवडा आहे. सध्या साथीचे आजार पसरत आहेत ताप, सर्दी , खोकला, या आजाराने रुगणांचे प्रमाण वाढत आहे . सरकारी दवाखान्यात मात्र रुग्णांचा कल कमी आहे , खोकल्याच्या औषधांचा तुटवडा ,लहान बाळांचे औषध ,रक्त लघवी विडल या इत्यादी सोयी या ठिकाणी उपलब्ध नाहीत. हिवताप कर्मचाऱ्याकडून तपासणी झाली तर रिपोर्ट यायला दोन ते चार दिवस लागतात तात्पुरती मलम पट्टी उपचार करून नाईलाजाने रुग्णांना खाजगी दवाखान्यात जावे लागत आहे .दवाखान्यामध्ये औषधांचा पुरेसा साठा नसल्याने गोरगरिब नागरिकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे.
तसेच नवीन आरोग्य केंद्राची इमारत मागील एक वर्षापासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. या इमारतीचे उद्घाटन होऊन येथून आरोग्याच्या सुविधा कधी मिळतील असा प्रश्न या परिसरातील जनतेतून विचारला जात आहे.
माजी मंत्री व सद्याचे विधान परिषदेचे आ. प्रा. राम शिंदे हे मागील भाजपा सरकारच्या काळात मंत्री असताना त्यांनी खर्डा पंचक्रोशीतील अरोग्याची समस्या ओळखून खर्डा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व तेथील कर्मचाऱ्यांसाठी वसाहतीसाठी तब्बल ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. या निधीतून प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम पूर्णही झाले आहे. हे काम पूर्ण होऊन साधारण एक वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र या आरोग्य केंद्राच्या उद्घाटना अभावी इथून नागरिकांनी सेवा मिळत नसल्याने हे कधी सुरू होणार असा प्रश्न खर्डा व परिसरातील नागरिकांमधून विचारला जात आहे.
सद्या वाढत्या महागाईच्या काळात गोर गरीबांना खाजगी आरोग्य सुविधा घेणे परवडत नसल्याने अनेक रूग्णांना व त्यांच्या नातेवाईकांनी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्या पार्श्वभूमीवर शासकीय रुग्णालयात सुविधा मिळाव्यात यासाठी गोरगरीबांचे प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा सरकारी रूग्णालयास प्राधान्य दिले आहे. यामुळे इमारत उभी असूनही या सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे लवकर या नवीन आरोग्य केंद्राचे उद्घाटन व्हावे अशी मागणी होताना दिसत आहे.
चौकट
खर्डा येथील नवीन इमारतीचे उद्घाटन केव्हा होईल हे आम्हाला सांगता येणार नाही. सध्या येथे दोन वैद्यकीय अधिकारी तात्पुरत्या स्वरूपात आहेत .ज्या जागा रिक्त आहेत त्या शासनाने भराव्यात. लोकसंख्येच्या प्रमाणात औषधे कमी पडतात .व्हायरल विषाणूमुळे रुग्ण आजारी पडतात मुंगेवाडी गावात आमची टीमने आरोग्याची काळजी बाबत भेट देऊन १२४ लोकांची तपासणी केली आहे. व नागरिकांना स्वच्छता राखण्याचे सांगितले आहे .
शुभदा पिलाजी
वैद्यकीय अधिकारी खर्डा
No comments:
Post a Comment