पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-५ नोव्हेंबर
जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील सोनेगाव येथील रहिवासी असणारे प्रा. सचिन सर गायवळ यांची महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेच्या उपाध्यक्ष पदी आज निवड झाली असून त्यांचे सर्वच स्थरावरून अभिनंदन केले जात आहे .
सचिन सर गायवळ हे याअगोदर पुणे जिल्हा बास्केटबॉल सचिव पदी होते . आता त्यांची निवड महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेच्या उपाध्यक्ष पदी झाली आहे. सचिन सर गायवळ यांची क्रीडाक्षेत्रात महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी बिनविरोध झालेली निवड जामखेड तालुक्यासाठी सन्मानाची बाब आहे. क्रीडा क्षेत्रात कुठलाही कौटुंबिक वारसा नसताना स्वकर्तुत्वाने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी नावलौकिक केलं आहे. प्रा. सचिन सर गायवळ यांनी समाजकारणात, राजकारणात व शिक्षणक्षेत्रात आपली जामखेड तालुक्यात एक वेगळीच ओळख निर्माण केलेली आहे. व ती युवकांसाठी प्रेरणादायी आहे .सचिन सर यांनी राजकारणाशिवाय समाजकारण, आणि समाजसेवा कशी करायची याचा आदर्शच त्यांनी समाजापुढे घालून दिला आहे आणि त्यामुळेच प्रा. सचिन सर गायवळ यांची लोकप्रियता खर्डा परिसर व जामखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आहे.आज त्यांच्या या महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेच्या उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्याने त्यांचे कौतुक व त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सर्वच स्थरावरून होत आहे .
No comments:
Post a Comment