पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-६ नोव्हेंबर
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना कर्जत जामखेड या त्यांच्या मतदारसंघात ग्रामपंचायत निवडणुकीत मोठा धक्का बसल्याचं दिसून येत आहे.
कर्जत तालुक्यामध्ये सहा ग्रामपंचायती तर जामखेड तालुक्यामध्ये तीन ग्रामपंचायती अशा एकूण 9 ग्रामपंचायती साठी निवडणूक झाली होती.
यामध्ये कर्जत तालुक्यातील सहा ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल हाती आले असून सर्वच्या सर्व सहाही ठिकाणी आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने विजय मिळवला आहे. तर जामखेड तालुक्यातील 3 ग्रामपंचायतमध्ये मधील दोन ग्रामपंचायती ह्या आमदार रोहित पवार यांच्या शरद पवार राष्ट्रवादी गटाकडे आली असून एक ग्रामपंचायत ही भाजपचे राम शिंदे यांच्याकडे गेली आहे.
एकूण कर्जत जामखेड मतदारसंघातील नऊ ग्रामपंचायत पैकी सात ग्रामपंचायत मध्ये भाजपचे राम शिंदे यांनी वर्चस्व सिद्ध केले असून आमदार रोहित पवार हे यामध्ये अपयशी झाल्याचे दिसून येत आहे.
जामखेड एकूण जागा 3
राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार गट) आ.रोहित पवार - 2
भाजप आ.राम शिंदे -1
कर्जत एकूण जागा 6
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आ.रोहित पवार - 0
भाजप आ.राम शिंदे -6
No comments:
Post a Comment