पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-६ फेब्रुवारी
गेली १४ वर्षांपासून करत असलेल्या प्रामाणिकपणे कामाची कदर करत आ. राम शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष अजय काशिद यांनी दिलेली युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडताना राजकारणापेक्षा समाजकारण करत गोरगरीब व सर्वसामान्य जनतेचे, यवूकांचे प्रश्न सोडवण्याचे काम करण्याबरोबरच आगामी लोकसभा व विधानसभेसह सर्वच निवडणूकांमध्ये याभागातून मताधिक्य मिळवून देण्यासाठी पक्ष संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन भाजपा युवा मोर्चाचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष बाजीराव गोपळघरे यांनी केले.
माजी मंत्री आमदार राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका अध्यक्ष अजय काशीद यांच्या नेतृत्वाखाली जामखेड तालुका भाजपाचे कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली असून खर्डा व परिसरातील कार्यकर्त्यांना यात चांगले स्थान देण्यात आले आहे. यामध्ये बाजीराव गोपाळघरे यांची युवा मोर्चा तालुकाध्यक्ष, सरपंच सौ. संजीवनी वैजीनाथ पाटील यांची महिला आघाडी तालुकाध्यक्ष, बाळासाहेब गोपाळघरे यांची चिटणीस, तर गणेश शिंदे चिटणीसपदी निवड झाल्याबद्दल खर्डा ग्रामपंचायतच्या वतीने आज दि. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी खर्डा ग्रापंचायतचे ग्रामविकास अधिकारी प्रशांत सातपुते, ग्रामपंचायत सदस्य गणेश शिंदे, मदन पाटील, नवनाथ होडशीळ, डॉ. सोपान गोपाळघरे, माजी सरपंच आसाराम गोपाळघरे, महालिंग कोरे, राजू मोरे, दीपक जावळे, पप्पू दिंडोरे, श्रीकांत लोखंडे ,नानासाहेब गोपाळघरे , गणेश ढगे, नामदेव गोपाळघरे अनिल दराडे भास्कर गोपाळघरे ,सुदाम होडशीळ, अभिमान गीते , प्रशांत कांबळे सर्व ग्रामपंचायत सदस्य , कर्मचारी व खर्डा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment