पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-६ जानेवारी
जामखेड शहरातील बीड रोड काॅर्नर येथे आपल्या वाढदिवसानिमित्त डिजिटल बॅनर लावणाऱ्या एका जणांवर गुन्हा दाखल करत जामखेड पोलीसांनी अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. याबाबतची फिर्याद जामखेड नगरपरिषदचे कर्मचारी बंकट माणिक खैरे (वय-४७) यांनी दिली असून त्यानुसार बर्थडे बाॅय विकास दामु तांदळे रा.भुतवडा रोड जामखेड याचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की. दि. ३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० : ०० वाजताचे सुमारास सुमारास जामखेड नगरपरिषदचे कर्मचारी बंकट माणिक खैरे, बाळु देवराव काळे व संतोष दशरथ पवार हे जामखेड शहरात अतिक्रमण व बॅनरची पाहाणी करत असताना, सदर कर्मचाऱ्यांना बीड कॉनर येथे बीड, पाटोदा, आंबाजोगाई असे अंतर व दिशा दर्शवणारा सार्वजनिक बांधकाम विभागाचा शासकीय बोर्डा समोर विकास भाऊ तांदळे यांचे वाढदिवसाचा प्लॅस्टीक बॅनर लावलेला दिसला. तेव्हा त्यांनी सदर बॅनर लावणारा विकास दामु तांदळे रा.भुतवडा रोड जामखेड यास बोलावुन घेऊन त्याचेकडे चौकशी केली असता. त्याने बॅनर लावल्याची कबुली दिली. त्यानुसार बंकट खैरे यांनी जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांना माहीती दिली. त्यानुसार मुख्याधिकारी यांनी खैरे यांना प्रस्तुत प्रकरणाची शासनातर्फे तक्रार देण्यासाठी तोंडी आदेश दिल्याने बंकट माणिक खैरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनाधिकृत डिजिटल फ्लेक्स बोर्ड लावणाऱ्या विकास दामु तांदळे वय-२२ वर्ष रा. भुतवडा रोड जामखेड ता. जामखेड यांचे विरूध्द महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध अधिनियम १९९५ चे कलम ३ प्रमाणे कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाचा पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्टेबल प्रविण इंगळे हे करत आहेत.
चौकट
गुन्हा दाखल झालेला आरोपीचा वाढदिवस साजरा करत असताना बंदी असलेला डिजे वाजवल्या प्रकरणी डिजे चालकावर ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच यापुढे जामखेड शहरात विनापरवानगी डिजीटल बॅनर लावणाऱ्यांविरूध्द जामखेड पोलीस व नगर परिषदेच्या वतीने संयुक्त कारवाई करण्यात येणार आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्यावतीने देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment