पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-१७ फेब्रुवारी
जामखेड तालुक्यातील खर्डा ग्रामपंचायतच्या भाजपच्या सरपंच सौ.संजीवनी वैजीनाथ पाटील यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव दाखल करण्याच्या हालचालींना वेग आला असून १५ ग्रामपंचायत सदस्य अज्ञातस्थळी गेले असल्याची माहिती मिळाली आहे.
खर्डा ग्रामपंचायतची सत्ता मिळवण्यासाठी भाजपा व राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे .एका टर्ममध्ये खर्डा ग्रामपंचायतला आता तिसरा सरपंच मिळणार आहे का? असा प्रश्न खर्ड्यातील सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे
खर्डा ग्रामपंचायतच्या मागील झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक हाती सत्ता आली होती. त्यावेळी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सौ. नमिता आसाराम गोपाळघरे यांची सरपंचपदी निवड झाली. त्यानंतर त्यांच्या अंतर्गत अंतर्गत विषयांमुळे सरपंच नमिता गोपाळघरे यांनी राजीनामा दिला. त्यावेळी राजकीय पातळीवर मोठ्या घडामोडी झाल्या आणि माजी मंत्री आमदार प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डा ग्रामपंचायत भाजपाला ताब्यात घेण्यात यश आले. आणि सरपंचपदी भाजपच्या संजीवनीताई पाटील यांची निवड झाली. आता पुन्हा भाजपच्या नाराज ग्रामपंचायत सदस्यांनी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य यांनी मिळून सरपंच सौ. संजीवनीताई पाटील यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्याच्या हालचालींना प्रचंड वेग आणला आहे. त्या अनुषंगाने खर्डा ग्रामपंचायतच्या १५ सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी सहलीसाठी अज्ञातस्थळी रवाना झाल्याने खर्डा शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
आज गुरुवार व खर्डा येथील बाजार असतो. बाजार दिवशी खर्डा व आसपासच्या वाड्या वस्त्यांवरून नागिरक कामानिमित्त खर्डा ग्रामपंचायत कार्यलयात येत असतात. मात्र आज ग्रामपंचायत कार्यलयात एकही सदस्य व कर्मचारी नसल्याने नागिरकांना परत जावे लागले आहे. खर्डा ग्रामपंचायत मध्ये कामकाज बंद असल्याचे पाहवयास मिळाले आहे.
आणि खर्डा व पंचक्रोशीतील नागरिकांना प्रश्न पडला आहे की, खर्डा ग्रामपंचायतला मिळणार तिसरा सरपंच ?
No comments:
Post a Comment