पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-१५ फेब्रुवारी
जामखेड तालुक्यातील खर्डा शाळेतील मुख्याध्यापक राम निकम यांची केंद्रप्रमुख पदी पदोन्नती
नुकतीच जिल्हा परिषदेने
शिक्षकांमधून पदोन्नतीची प्रक्रिया पार पाडली .यामध्ये केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी पदी सेवा जेष्ठ शिक्षकांमधून पदोन्नती देण्यात आल्या. यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खर्डा मुले येथील कार्य तत्पर मुख्याध्यापक राम निकम यांना पाटोदा तालुका जामखेड केंद्राच्या केंद्रप्रमुख पदी पदोन्नती मिळाली आहे .त्यांना काल खर्डा शाळेच्या वतीने व खर्डा गावाच्या वतीने निरोप देण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खर्डा ग्रामपंचायतचे सरपंच व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वैजीनाथ पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे केंद्रप्रमुख केशव गायकवाड व सेवानिवृत्त जेष्ठ शिक्षक दिगंबर थोरात पोपट भुते, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोज मिसाळ , ग्रामपंचायत सदस्य गणेश शिंदे, ग्रामपंचायत सदस्य अशोक खटावकर, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
खर्डा मुले, खर्डा मुली व खर्डा उर्दू शाळेतील सर्व शिक्षक यांनी आपली मनोगते व्यक्त केली .यावेळी बोलताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वैजीनाथ पाटील म्हणाले निकम सर यांनी खर्डा शाळेमध्ये आपल्या कामाचा चांगला ठसा उमटवला. शाळेच्या भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी सतत ग्रामपंचायत व ग्रामस्थांशी संपर्क ठेवून भौतिक सुविधा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. सतत कामात राहून व सर्व शिक्षकांना हाताशी धरून शाळेमध्ये आनंददायी वातावरण तयार केले व गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले ,याचे फळ म्हणून त्यांना पदोन्नती मिळून केंद्रप्रमुख झाले याचा आम्हा सर्वांना खूप आनंद आहे. त्यांच्या भावी आयुष्यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.

निकम हे प्राथमिक शिक्षक म्हणून १९९१ रोजी सावरगाव या ठिकाणी रुजू झाले होते .त्यानंतर त्यांनी पदवीधर शिक्षक म्हणून देवदैठण येथे पदोन्नती घेतली होती. तसेच फक्राबाद येथून मुख्याध्यापक पदोन्नतीने ते खर्डा शाळेत आले होते. खर्डा शाळेत त्यांनी दोन वर्ष सेवा केली या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी शाळेचा चेहरा मोहरा बदलून टाकला होता.
शाळेत परसबाग ,फुलबाग, वृक्षारोपण तसेच भाजी बाजार व शैक्षणिक सहल आदी बाबी राबवून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विद्यार्थ्यांसाठी हात धुण्याची व्यवस्था, स्वच्छ व फिल्टर पाण्याची व्यवस्था केली होती.
No comments:
Post a Comment