पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-१४ फेब्रुवारी
कर्जत व जामखेड या दोन तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आमदार प्रा.राम शिंदे हे पुन्हा एकदा धावून आले आहेत. आमदार राम शिंदे यांनी हाती घेतलेल्या पाठपुराव्यामुळे मृदू व जलसंधारण विभागाने कर्जत जामखेड मतदारसंघात 7 बंधाऱ्यांना मंजुरी दिली आहे. या कामांसाठी सुमारे 8 कोटी 50 लाख 20 हजार 81 रूपयांच्या निधीस महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती आमदार प्रा राम शिंदे यांनी दिली.
0 ते 100 हेक्टर सिंचन क्षमतेच्या कर्जत व जामखेड या तालुक्यातील एकुण 7 (गे.सा.ब.व को.प.ब) बंधाऱ्यांच्या योजनांना मृदू व जलसंधारण विभागाच्या सन 2022- 23 च्या दरसुचीनुसार मान्यता देण्यात आली आहे. यासाठी सुमारे साडे आठ कोटींचा निधी मंजुर करण्यात आला आहे. यात जामखेड तालुक्यात 2 तर कर्जत 4 बंधाऱ्यांना मंजुरी मिळाली आहे. सदर योजनांच्या प्रशासकीय मान्यता अंदाजपत्रकानुसार एकुण साठवण क्षमता 744.43 स.घ.मी असून त्याची एकुण सिंचन क्षमता 176 हेक्टर इतकी असणार आहे. शेतीच्या पाण्याबरोबर पिण्याच्या पाण्याचीही सोय या बंधाऱ्यामुळे होणार आहे.
0 ते 100 हेक्टर सिंचन क्षमतेच्या कर्जत व जामखेड तालुक्यासाठी मंजुर झालेल्या कामांमध्ये जामखेड तालुक्यातील नागोबाचीवाडी (जि.प.शाळा) येथे कोल्हापूर पध्दतीचा बंधारा मंजुर करण्यात आला आहे. याची साठवण क्षमता 17.55 स.घ.मी इतकी असणार आहे. यासाठी 30 लाख 73 हजाराचा निधी मंजुर झाला आहे. तर भुतवडा क्रमांक 1 येथे कोल्हापूर पध्दतीचा बंधारा मंजुर झाला आहे. यासाठी 90 लाख लाख रूपये मंजुर झाले आहे. या बंधाऱ्याची साठवण क्षमता 51.78 स.घ.मी इतकी असणार आहे.
कर्जत तालुक्यातील कोभंळी येथील शेलार मळा (तळ्याच्या खाली) येथे कोल्हापूर पध्दतीचा बंधारा मंजुर झाला आहे. त्यासाठी 69.37 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. याची साठवण क्षमता 39.75 स.घ.मी इतकी असणार आहे. तर मुळेवाडी (रानमळा) येथे कोल्हापूर पध्दतीचा बंधारा मंजुर झाला आहे. त्यासाठी 34 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. याची साठवण क्षमता 19.76 स.घ.मी इतकी आहे. तर मलठण येथे सर्वात मोठा कोल्हापूर बंधारा मंजुर झाला आहे. यासाठी 5 कोटींचा निधी मंजुर झाला आहे. याचा साठवण क्षमता 544.67 स.घ.मी असणार आहे. यातून 97 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. तर अळसुंदे येथील वाघमारे वस्ती - विटभट्टीजवळ गे.सि.ना.बंधारा मंजुर झाला आहे. यासाठी 41 लाखांचा निधी मंजुर झाला आहे. तसेच थेरगाव (शिंदे मळा) येथे कोल्हापूर पध्दतीचा बंधारा मंजुर झाला आहे. त्यासाठी 83 लाख रूपये मंजुर झाले आहेत.
आमदार प्रा राम शिंदे यांनी पाठपुरावा करत कर्जत जामखेड या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बंधारे मंजुर करून आणल्याबद्दल मतदारसंघातील जनतेत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी वर्गातून आमदार प्रा.राम शिंदे यांचे आभार मानले जात आहे.
चौकट
कर्जत व जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात प्रगती व्हावी, यासाठी माझा नेहमीच प्रामाणिक प्रयत्न असतो, मंत्री असताना जलसंधारणाची अनेक कामे केली. त्यातून शेतीला पाणी उपलब्ध झाले. आता महायुती सरकारच्या माध्यमांतून मतदारसंघातील जलसंधारणाची कामे मार्गी लागावीत यासाठी माझा पाठपुरावा सुरु आहे. त्यामुळे बंधाऱ्यांच्या कामांसाठी सरकारने 8 कोटी 50 लाखांची 7 बंधारे मंजूर केली आहे. या कामांमुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. सरकारने बंधाऱ्यांच्या कामांसाठी भरघोस निधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंधारण मंत्री संजय राठोड, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील सह महायुती सरकारचे मनापासून आभार !
--- आमदार प्रा.राम शिंदे
No comments:
Post a Comment