पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-१४ फेब्रुवारी
मराठा आरक्षणासाठी अंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला जामखेड तालुक्यातील खर्डा येथे चांगला प्रतिसाद दिल्याने खर्डा कडकडीत बंद राहिले.
मराठा आरक्षणासाठी अंदोलन करणारे आरक्षण योध्दा मनोज जरांगे यांनी शासनाने आरक्षणाची अंमलबजावणी करावी यासाठी आंतरवली सराटी येथे
पुन्हा उपोषण सुरू केले आहे. यास पाठींबा देण्यासाठी आज दि. १४ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक मराठा संघटनेच्या वतीने देण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाच्यावतीनेही खर्डा शहर बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यास प्रतिसाद देत खर्डा येथे कडकडीत बंद पाळला.
No comments:
Post a Comment