पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-१३ फेब्रुवारी
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला आहे. महाराष्ट्र भाजपच्या कार्यालयात हा सोहळा पार पडला.
यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थित होते.
तसंच, नांदेडचे खासदार प्रताप चिखलीकर, भाजप नेते हर्षवर्धन पाटील हेही हजर होते.अशोक चव्हाणांच्या पक्ष प्रवेशामुळे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "अशोक चव्हाण, राजूरकर यांचं भाजपमध्ये स्वागत करतो. त्यांच्या येण्याने भाजप, महायुतीची शक्ती भक्कम झाली आहे.
"देशभरात पंतप्रधान मोदी भारताला विकसित करण्याचं स्वप्न पूर्णत्वाकडे नेण्याचं काम सुरू केलं. जे परिवर्तन देशात दिसू लागलं. त्यामुळे राज्यातील अनेक नेत्यांना मोदींच्या नेतृत्त्वात काम करावं, आपणही यात वाटा उचलावा असा विचार आला. यात अशोक चव्हाण सुद्धा आहेत. त्यांनी केवळ एवढेच सांगितले की विकासाच्या योग्य धारेत काम करण्याची संधी द्या. माझी कुठलीच लालसा नाही असं त्यांनी सांगितलं."
महाराष्ट्रात येत्या लोकसभेच्या निवडणुकीत मराठवाड्यात महायुतीला विशेष बळ मिळेल, असंही फडणवीस म्हणाले.
No comments:
Post a Comment