पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/१९ मे
जामखेड तालुक्यातील ऐतिहासिक खर्डा गावचे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते कै. श्रीपाळ नागनाथ भाळवणकर यांच्या पत्नी कै. आनंदीबाई श्रीपाळ भाळवणकर यांचे दिनांक नऊ मे रोजी दुःखद निधन झाले होते. कै. आनंदीबाई भाळवणकर यांचा स्वभाव अतिशय मनमिळावू होता. त्या धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या. सामाजिक व धार्मिक कार्यामध्ये ते नेहमीच मदत करत असत. त्यांच्या निधनाने मात्र कौटुंबिक जीवनात व धार्मिक लोकांच्या मनातील आनंद हरपल्याची भावना यावेळी त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी बोलून दाखवली..त्यांचा तेरावा शांती विधान पूजन विधि त्यांच्या राहत्या घरी 21 मे रोजी संपन्न होत आहे. श्वेतांबर जैन स्थानक या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सर्व विधी धार्मिक पद्धतीने करण्यात येणार आहेत .यावेळी भोजनाची व्यवस्था ही करण्यात आली आहे. पुणे येथील उद्योगपती त्यांचे चिरंजीव प्रदीप श्रीपाळ भाळवणकर, अजित श्रीपाळ भाळवणकर प्रगतशील शेतकरी व जनरल कटलरी मालाचे व्यापारी आणि सर्व भाळवणकर परिवार या दुःखातून अजूनही सावरलेला नाही. त्यांच्या या दुःखद प्रसंगी भाळवणकर कुटुंबाला ईश्वर शक्ती देवो हीच अपेक्षा सर्वसामान्य माणसाच्या मनातून व्यक्त होत आहे. तरी समाजातील व प्रतिष्ठित व्यापारी, ग्रामस्थ, नातेवाईक, आप्तेष्ट ,परिवार या सर्वांनी 21 मे रोजी होणाऱ्या या शांती विधान पूजन विधी सोहळ्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन भाळवणकर कुटुंबाच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment