पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/१८ मे
जामखेड शहरातील खर्डा रोडवरील आ.रोहित पवार यांच्या कार्यालया समोरून दि. ९ मे २०२४ रोजी सकाळी ११ : ०० ते १ : ०० वाजताचे दरम्यान कोणीतरी अज्ञात मोटरसायकल चोराने यातील फिर्यादी महेंद्र अजिनाथ बारस्कर (वय ३९) रा. वाघा ता. जामखेड यांची अंदाजे १५,०००/ रुपये किमतीची हिरो होडा कंपनीची स्पेलडर मोटार सायकल नं जीजे १६ एम ४८२० ही फिर्यादीचे संमतीशिवाय लबाडीच्या इरादयान स्वताःचे फायदयाकरीता चोरुन नेली आहे. फिर्यादीवरून दि.१५ मे २०२४ रोजी गु.र.क्र व कलम २५१/२ ०२४ भा.द.वि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा रजि. दाखल केला आहे.
पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक जे.ए. सरोदे हे करत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा