पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/९ ऑगस्ट
जामखेड तालुक्यातील दिघोळ ग्रामपंचायत राजकीय दृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे ठरलंप्रमाणे उपसरपंच पदाची निवडणूक बिनविरोध होणार होती परंतु ऐनवेळी अशोक आजिनाथ गीते यांनी अर्ज दाखल केला त्यामुळे निवडणूक घेण्यात आली यावेळी उपसरपंच पदासाठी दशरथ कचरू राजगुरू व अशोक आजिनाथ गीते यांनी अर्ज दाखल केले यामध्ये गुप्तचिट्ट्या टाकून मतदान घेण्यात आले दशरथ राजगुरू यांना सहा मते तर अशोक गीते यांना पाच मते पडली त्यामुळे दशरथ राजगुरू यांची उपसरपंच पदी एकमताने निवड करण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर डी तांबोळी यांनी काम पाहिले तर पोलीस पाटील राजेंद्र गीते यांनी निवडणूक कामे सहकार्य केले यावेळी ग्रामपंचायत सरपंच रंजना पिराजी दगडे माजी सरपंच रेखा अर्जुन गीते माजी उपसरपंच पवन डावकर सदस्य सविता संतोष शिंदे बळीराम बाबासाहेब तागड भीमराव विधाते राणी आवारे कौताबाई गीते यमुनाबाई रंधवे हे सदस्य उपस्थित होते
या निवडणुक महत्त्वाची भूमिका सरपंच पिराजी विठ्ठल दगडे माजी पंचायत समिती सदस्य मनोज राजगुरू माजी सरपंच नानासाहेब गीते संतोष शिंदे पवन डावकर सुरज रसाळ संतोष माने तंटामुक्ती अध्यक्ष पैलवान धीरज रसाळ तय्यब शेख वसंत रसाळ व मित्रपरिवार या सर्वांनी बजावली उपसरपंच पदी दशरथ राजगुरू यांची निवड झाल्याबद्दल आमदार राम शिंदे यांनी दूरध्वनीवरून अभिनंदन केले तसेच परळी विधानसभा मतदारसंघाचे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना समिती अध्यक्ष वाल्मिक कराड, भाजपा तालुका अध्यक्ष अजय काशीद, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शरद कार्ले, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ.भगवान मुरूमकर ,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र सुरवसे, नगरसेवक अमित चिंतामणी ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन घुमरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वैजनाथ पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक गौतम उतेकर ,भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष बाजीराव गोपाळघरे, केशव वनवे, संजय गोपाळघरे, सरपंच महारुद्र महानवर, नानासाहेब गोपाळघरे, सुभाष जायभाय, संदीप जायभाय यांनी अभिनंदन केले आहे
No comments:
Post a Comment