पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-१ डिसेंबर
इंटरनेटच्या युगात तरुणाईने एच.आय.व्ही./एड्स यांवर पथदर्शी अधिक काम करून चर्चा घडवून आणून सशक्त भारत घडविण्यासाठी आरोग्याचा नवा दृष्टीकोन अंगिकारावा असे प्रतिपादन जामखेड न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रजनीकांत जगताप यांनी केले.जागतिक एच.आय.व्ही./एड्स सप्ताहानिमित्त स्नेहालय,ग्रामीण रुग्णालय,विधी व सेवा प्राधिकरण, जामखेड वकील संघ आणि १७ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी.यांच्या संयुक्त विद्यमाने ल.ना.होशिंग ज्यू.कॉलेजच्या सभागृह येथे जाणीव जागृती कार्यक्रम आणि शहरात काढण्यात आलेल्या एच.आय.व्ही./एड्स रॅली'ला संबोधीत करतांना ते बोलत होते.यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ.शशांक वाघमारे,वैदयकीय अधिकारी डॉ.मनोज शिंदें,प्राचार्य श्रीकांत होशिंग,उपप्राचार्य पोपट जरे,प्रमुख व्याख्याते प्रा.तुकाराम घोगरदरे,वकील संघाचे अध्यक्ष ऍड.ए. के.शेख,स्नेहालय जिल्हा समन्वयक योगेश अब्दुले,समुपदेशक सुप्रिया कांबळे,प्राचार्य बी.के.मडके,स्नेहज्योत प्रकल्प क्षेत्रिय अधिकारी मजहर खान,विधी व सेवा प्राधिकरणचे ऍड.पी.एम.कात्रजकर,,श्याम जाधवर,एन.सी.सी.विभाग प्रमुख कॅप्टन गौतम केळकर,सेकंड ऑफिसर अनिल देडे,थर्ड ऑफिसर मयूर भोसले,ऍड.नागरगोजे
प्रमुख पाहुणे म्हणून विचार मंचावर उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेत स्नेहालयचे जिल्हा समन्वयक योगेश अब्दुले म्हणाले की; एच.आय.व्ही./एड्स बाबत तरुणांईमध्ये जाणीव जागृती होणे आवश्यक आहे.त्यासाठी स्नेहालय व जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभाग यांच्या माध्यमातून एड्स मुक्त भारत स्वप्नं नव्हे ध्येय हे ब्रीद घेऊन गेल्या तीन दशकांपासून स्नेहालय यावर जनजागृती करत आहे.महिला आणि बालकांच्या प्रश्नांवर एक पथदर्शी काम स्नेहालय'ने उभे केले आहे.एच.आय.व्ही.एड्स'चा प्रसार रोखण्यासाठी अतिजोखिमचे वर्तन असणारे भागांमध्ये जाणीव जागृतीचे काम करते आहे.महिला,बालकांच्या आणि संसर्गित व्यक्तींच्या अधिकारांच्या प्रश्नांवर स्नेहालय नेहमीच आग्रही भूमिका घेते.एच.आय.व्ही.चा समूळ उच्चाटन करण्यासाठी अधिकाधिक तरुणांईने पुढे यायला हवे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.पुढे बोलतांना न्यायाधीश जगताप म्हणाले की;जागतिक स्तरावरील विचार करता एच.आय.व्ही./एड्स संसर्गित व्यक्तींसाठी कलंक आणि भेदभाव टाळून समतेचा विचार घेऊन,ज्ञानाचा प्रसार करून एड्सला आळा घालण्यासाठी प्रतिबंध आणि लोकांमध्ये जनजागृती हाच मार्ग आहे.इंटरनेट च्या युगात तरुणाईने वाहवत न जाता त्याचा उपयोग समाजहितासाठी करावा.भारतीय राज्यघटनेने बहाल केलेले समानतेचे अधिकार अंगिकारून आदर्श नागरिक बनून लोकशाही बळकट करूया.यांवर गेल्या तीन दशकांमध्ये स्नेहालय संस्थेने यावर पथदर्शी काम उभे केले आहे तरुणाईने याचा आदर्श घेऊन जाणीव जागृतीच्या या कामात स्वतःला झोकून देऊन या विधायक कार्यात सहभागी व्हायला हवे असे ते म्हणाले.यावेळी स्नेहालयाच्या कामाचे कौतुकही त्यांनी केले.यावेळी प्रा.तुकाराम घोगरदरे यांनी एच.आय.व्ही./एड्स-तरुणाई आणि भारतासमोरील आव्हाने यांवर भाष्य केले.
यावेळी उपस्थितांना एड्स प्रतिबंधासाठी प्रतिज्ञा देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रॅली'ला हिरवा झेंडा दाखवून सुरवात झाली.या रॅलीत जामखेड महाविद्यालय,रयत शिक्षण संस्थेचे श्रीनागेश विद्यालय,ल.ना.होशिंग विद्यालयाचे एन.सी.सी.कॅडेटसह विध्यार्थी-विध्यार्थिनींसह आशा स्वयं सेविका,गतप्रवर्तक,तसेच इतर स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते,विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून सहभागी झाले होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी योगेश अब्दुले मझहर खान,सुप्रिया कांबळे, श्याम जाधवर,रोहित होडशीळ,प्रा.संकेत पवार,प्रा.प्रल्हाद साळुंके यांनी विशेष परिश्रम घेतले.या उपक्रमाचे १७ महाराष्ट्र बटालियन चे कमांडिंग ऑफिसर करणारी चेतन गुरुपक्ष,ऍडम ऑफिसर लेफ्टनंट कर्नल रणजीत सिंग यांनी विशेष कौतुक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.श्रीमती.स्वाती सरडे यांनी तर आभार प्रदर्शन मजहर खान यांनी केले.
No comments:
Post a Comment