पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-१ डिसेंबर
भारतीय डाक विभागातील कोरेगाव येथील डाक सेवक गोदड थोरात हे नुकतेच डाक विभागातून सेवानिवृत्त झाले. ते नाथा या नावाने कर्जत व कोरेगाव पंचक्रोशीत परिचित होते. त्यांच्या सेवा निवृत्तीचा कार्यक्रम कोरेगाव व कर्जत या ठिकाणी झाला.
गोदड थोरात यांचा सपत्नीक शाल, श्रीफळ, हार,फेटा बांधून मा.सभापती बापू शेळके पहिले भगवंत केसरी, आदर्श सरपंच, काकासाहेब शेळके, कांतीलाल वाघ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला कर्जत उपविभागाचे, उपविभागीय डाक अधिकारी अमित देशमुख, कर्जत चे पोस्ट मास्तर रावसाहेब चौधरी, डाक आवेक्षक मोहन पंडित, सुनील धस, अशोक बंडगर, दुर्गेश शेटे, संतोष गदादे, अब्बास मुलांनी, प्रफुल्ल वाघमारे, सुभाष अनारसे, सूरज तोरडमल आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाक सेवक संघटनेचे नेते चंद्रकांत नेटके यांनी केले तर आभार प्रदर्शन दिलीप खरात यांनी मानले, मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.
No comments:
Post a Comment