पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२ डिसेंबर
जामखेड तालुक्यातील ऐतिहासिक व धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचे असलेल्या खर्डा गावात अवैद्य धंद्याचा सुळसुळाट झाला असून परिसरातून येणाऱ्या शाळकरी मुली, प्रवाशी महिला व सर्व सामान्य नागरिकांना याचा मोठा त्रास होत आहे. शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेला खर्डा बसस्थानकावर दारूडे व टवाळखोर व रोड रोमीयोंचा मोठा त्रास परगावाहून एसटी बस व खासगी वाहने यांनी येणाऱ्या विद्यार्थींनी मोठा त्रास होत आहे. या भागात मोठी गुन्हेगारी असल्याने नविन पोलीस स्टेशनची स्थापना झाली असून हे पोलीस स्टेशन बसस्थानकालगतच आहे. मात्र असे असूनही महिला विद्यार्थीनी व सर्व सामान्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे. तरी पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन या समस्येतून सुटका करावी व अवैद्य धंदे व अवैद्य प्रकार याचा बंदोबस्त करावा अशी मागणी महिला, विद्यार्थीनी, सर्वसामान्य नागरिक व प्रवाश्यांमधून होत आहे.
खर्डा शहर हे जामखेड तालुक्याचे शेवटचे टोक आहे. या ठिकाणी मराठ्यांच्या शेवटच्या विजयी लढाईचा साक्षीदार असलेला भुईकोट किल्ला, देशातील बारा ज्योतिर्लिंगाच्या प्रतिकृती असलेली बारा महादेवाची मंदिरे खर्डा परिसरात आहेत. तसेच सिताराम गड, गितेबाबा मंदिर, कानिफनाथ मंदिर या सह अनेक धार्मिक स्थळं येथे आहेत यामुळे मोठ्या प्रमाणात भाविक व पर्यटक दररोज येथे येत असतात. खर्डा हे परिसरातील मोठे गाव असल्याने येथे हजारोंच्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थींनी शिक्षण घेत आहेत. येथील व्यापारीपेठ ही मोठी आहे. यामुळे मोठी रहदारी असते.
रहदारी मोठी असल्याने खर्डा शहर व परिसरात अवैध धंद्याचा सुळसुळाटही मोठ्या प्रमाणात आहे. खर्डा शहर व लगतच्या हाॅटेल्स मधुन बेकायदेशीर पणे देशी विदेशी दारू विक्री केली जाते, शहरात अनेक भागात गावठी दारूचे आड्डे, झूगार आड्डे, मटका अड्डे सर्रास पणे व खुलेआम सुरू आहेत. यामुळे शहरात दारूडे, झुगरी व व्यसनी लोकांचा वावर मोठा असल्याने सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासाबरोबरच खर्डा शहरात गुन्हेगारी वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक वर्षांच्या मागणीनंतर पोलीस स्टेशनला मंजूरी मिळून ते कार्यान्वित सुध्दा झाले आहे. मात्र खर्डा शहरातील अवैध धंदे व गुन्हेगारी रोखण्यासाठी कोणताही प्रयत्न स्थानिक पोलीस स्टेशन कडून होताना दिसत नाही. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून याबाबत कार्यवाही होणे गरजेचे आहे. तसेच माजी मंत्री व विधान परिषदेचे आमदार. प्रा. राम शिंदे व विधान सभेचे आमदार रोहित पवार यांनीही याकडे लक्ष द्यावे अशी मागणी खर्डा व परिसरातील सर्वसामान्य जनतेतून होत आहे.
चौकट
जामखेड तालुक्यातील सर्वात मोठे गाव खर्डा हे असून या गावात सर्रास पणे अव्यध धंदे चालू आहेत शहरातील अवैध धंद्यांना पोलिसांनीच नाहरकत दिली की काय, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
No comments:
Post a Comment