खर्डा प्रतिनधी/६ मार्च२०२५
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील पुरातन लक्ष्मी आई मंदिराच्या सभामंडप बांधकामासाठी आमदार रोहित पवार यांनी १ लाख रुपयांची मदत केली आहे. ही मदत राम हवेली, खर्डा येथे ग्रामस्थांच्या उपस्थितीत रोख स्वरूपात देण्यात आली असून या सभामंडपाचे काम सुरू झाले असून, मंदिरावर स्लॅब टाकण्यात आला आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
खर्डा शहर हे ऐतिहासिक शहर असून पर्यटनाच्या व धार्मिक दृष्ट्या महत्वाचे शहर आहे. खर्डा शहरात आमदार रोहित पवार यांनी अनेक विकास कामे केली आहेत. लक्ष्मी आई मंदिराच्या सभामंडपामुळे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना, नागरिकांना चांगली सोय व्हावी म्हणून रोहित पवार यांनी सभामंडपाच्या बांधकामाकरिता एक लाख रुपायांची रोख स्वरूपात मदत केली आहे . तसेच रोहित पवार यांनी मंदिराकरिता मदत केल्यामुळे सर्व खर्डा ग्रामस्थांच्या वतीने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर यांनी आमदार रोहित पवार यांचे आभार व्यक्त केले आहेत.
या मदतीमुळे मंदिराच्या विकासात आणखी चालना मिळणार आहे. या प्रकल्पामुळे ग्रामस्थांच्या धार्मिक भावनांना मान्यता मिळत असून त्यांच्या सांस्कृतिक वारशाचे जतन होत आहे.व
आमदार रोहित पवार यांच्या या मदतीमुळे खर्डा शहरातील धार्मिक पर्यटनाला चालना मिळण्याची शक्यता आहे. हे काम ग्रामस्थांच्या सांस्कृतिक व धार्मिक गरजांना पूर्ण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा