जामखेड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या खर्डा ग्रामपंचायतच्या सरपंच संजीवनी वैजीनाथ पाटील व ग्रामविकास अधिकारी बबन बहिर व काही सदस्यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून खर्डा ग्रामपंचायत वार्ड क्रमांक एकच्या अनुसूचित जाती प्रवर्गाच्या महिला सदस्या राजीनामा सुनिता दिपक जावळे यांनी सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांचेकडे राजीनामा दिला असून तो मंजूर करावा अशी मागणी केली आहे.
हा राजीनामा सपुर्द केल्यानंतर ग्रामपंचायत सदस्या सुनिता जावळे यांनी सांगितले की, मी गेली चार वर्षांपासून खर्डा ग्रामपंचायतची सदस्या असून सद्या कार्यरत असलेल्या सरपंच संजीवनी पाटील व ग्रामविकास अधिकारी बबन बहिर हे मी सदस्य असलेल्या वार्डमध्ये असलेल्या भिमनगर या दलीत वस्तीत काम करत नाहीत. त्यांनी आतापर्यंत कोणत्याही वित्त आयोगातून कोणत्याही प्रकारचे काम केलेले नाही. तसेच दलीत वस्ती योजनेचा निधीही भिम नगरमध्ये वापरला जात नाही. परिणामी माझ्या वार्ड मधील दलित समाज विकासापासून वंचित राहत आहे. तसेच भिमनगर मध्ये मंजूर असलेली आंगणवाडी दुसऱ्या ठिकाणी बांधण्याबाबत हालचाली सुरू आहेत. त्यामुळे भिमनगर मधील लहानमुलांचेही भवितव्य धोक्यात येणार आहे. तसेच ज्या महापुरुषांनी समाजासाठी अनमोल असे काम केले. त्यांचे फोटोही वारंवार सांगूनही लावले जात नाही. त्यामुळे जर मी प्रतिनिधित्व करत असलेल्या प्रभागातील नागरिकांबरोबर दुजाभाव व ते विकासापासून वंचित राहत असतील तर आपण सदस्य राहून काय उपयोग? यामुळे मी सदर राजीनामा दिला असल्याचे सुनिता जावळे यांनी सांगितले आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा