पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/५ मार्च २०२५
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या क्रूर फोटो व्हायरल झाल्यानंतर, जामखेडमध्ये आज कडकडीत बंद पाळण्यात आला. या हत्येच्या निषेधार्थ माजी मंत्री धनंजय मुंडे सह वाल्मीक कराड याच्या सह आरोपींच्या पुतळ्यांचे दहन करण्यात आले आहे.यावेळी आंदोलनकर्त्यांनी आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी म्हणून मोठ्या प्रमाणावर घोषणा दिल्या.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली आणि त्याचे फोटो व्हायरल झाले. या घटनेनंतर जामखेडमध्ये ५ मार्च रोजी कडकडीत बंद पाळण्यात आज आला आहे .आरोपींच्या पुतळ्यांचे दहन करण्यात आले आणि आंदोलनकर्त्यांनी आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी म्हणून मोठ्या प्रमाणावर घोषणा दिल्या आणि मोर्चा काढला. संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास पुन्हा करून आरोपींना तातडीने शिक्षा मिळावी यासाठी मागणी करण्यात आली. आंदोलनात सकल मराठा समाजासह विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.
आंदोलनात माजी सभापती शरद कार्ले, मंगेश (दादा) आजबे, डॉ. भगवान मुरुमकर, दत्तात्रय वारे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे अध्यक्ष पांडुराजे भोसले, सुर्यकांत मोरे, हवा (दादा) सरनोबत, प्रदिप टाफरे, विकास (तात्या) राळेभात, पवन राळेभात, प्रशांत राळेभात, राहुल उगले, संजय काशिद, संपत राळेभात, बापूसाहेब कार्ले, अवदुत पवार, डॉ. भरत देवकर, डॉ प्रशांत गायकवाड, प्रविण बोलभट, उमर कुरेशी, गणेश हगवणे, आण्णा ढवळे, तात्यासाहेब बांदल, प्रदिप बोलभट, अॅड हर्षल डोके, अॅड प्रमोद राऊत, डॉ कैलास हजारे, नय्युम शेख, गणेश काळे, पप्पू काशिद, प्रविण उगले, तात्यासाहेब जरे सह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा