पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-३० नोव्हेंबर
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले रंगोली कलेक्शन या वस्त्र दालनाच्या दीपावली खरेदी धमाका २१बक्षिसांची सोडत ठेवण्यात आली होती. त्या बक्षिस योजनेची सोडत दिनांक ३० नोव्हेंबर रोजी खर्डा येथील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडली.
यावेळी बोलताना रंगोली कलेक्शनचे संचालक रवींद्र सुरवसे म्हणाले की, आम्ही ग्राहकांना नवीन व्हरायटीज व माफक दरात वस्त्रदालनाचा व्यवसाय भव्य अशा शोरूमच्या माध्यमातून सुरू केला आहे, दिवसेंदिवस वाढता कल पाहता आमच्या वस्त्रदानलाला खर्डा परिसर व मराठवाड्यातून गिऱ्हाईक आमच्या दुकानात वस्त्र खरेदी करीत आहेत, दीपावली निमित्त आम्ही दोन हजार रुपयांचे वस्त्र खरेदी वर एक कुपन भेट देऊन त्या माध्यमातून यावर्षी २१ बक्षिसांची लकी ड्रॉ सोडतच्या माध्यमातून योजना ग्राहकांसाठी ठेवल्या होत्या. तसेच दरवर्षी आम्ही ग्राहकासाठी बक्षीस योजना ठेवत राहू असे रवींद्र सुरवसे यावेळी बोलताना म्हणाले.
यावेळी प्रथम बक्षीस टीव्हीएस मोटरसायकलची सोडत खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांच्या हस्ते लकी ड्रॉची चिट्ठी काढण्यात आली.त्या बक्षीसाचे मानकरी वैभव संतोष गोपाळघरे नागोबाची वाडी हे शेतकरी ठरले,तर द्वितीय बक्षीस वॉशिंग मशीन सुदर्शन महादेव गीते यांना मिळाले, तर तिसरे बक्षीस एलसीडी टीव्ही प्रतीक बळीराम शिंदे यांना मिळाले. त्यानंतर चौथे बक्षीस फॅन पंखा तीन विजेते, पाचवे कुकरचे तीन बक्षीस विजेते, तर बॅटरीचे सात बक्षीस विजेते, नंतर राहिलेले इस्त्रीचे सहा बक्षिसे विजेते अशा पद्धतीने लकी ड्रॉच्या बक्षीस विजेता ग्राहकांना सोडतीच्या माध्यमातून २१ बक्षिसांची लय लूट मिळाली आहे.
या कार्यक्रमास उपस्थित बाजार समिती संचालक वैजीनाथ पाटील, माजी सरपंच राम भोसले, माजी सरपंच आसाराम गोपाळघरे, माजी सरपंच संजय गोपाळघरे, अर्जुन शिंदे, बाळासाहेब गीते, सुनील लोंढे, टील्लू पंजाबी, भागवत सुरवसे, पत्रकार दत्तराज पवार, बाळासाहेब शिंदे, अनिल धोत्रे, किशोर दूशी, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गोलेकर, मदन पाटील,नवनाथ होडशिळ, दीपक जावळे, महेश दिंडोरे,गणेश शिंदे, श्रीकांत लोखंडे,रमेश सुरवसे,गणेश जाधव, रंगोली कलेक्शनचे संचालक नितीन सुरवसे दुकानचे सर्व कर्मचारी व खर्डा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment