पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-३० नोव्हेंबर
जामखेड तालुक्यातील बावी ग्रामपंचायत आमदार प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व सामाजिक कार्यकर्ते सचिन सर गायवळ व निलेशभाऊ गायवळ यांच्या खंबीर साथीने भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आली असुन बावी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सौ. प्रियंका गणेश पवार यांची सरपंच पदी बिनविरोध निवड झाली आहे.
ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेणे, महिला सदस्यांना सन्मान न देणे, मनमानी व गैर कारभार करणे असे अनेक आरोप करत जामखेड तालुक्यातील बावी गावचे सरपंच निलेश दादासाहेब पवार यांच्याविरोधात काही दिवसांपूर्वीच याच्या विरोधात उपसरपंच दादासाहेब मंडलिक, ग्रामपंचायत सदस्य महादेव पोपट कारंडे, प्रियंका गणेश पवार, मनिषा सुनिल कारंडे, सुनिता नानासाहेब कवादे, बायमाबाई गुलाब मंडलिक या ६ सदस्यांनी जामखेड तहसील कार्यालयात अविश्वास ठराव दाखल केला होता.
आज दि ३० नोव्हेंबर रोजी सरपंच निवडीचा कार्यक्रम होता. निवडणुक निर्णय अधिकारी मंडल अधिकारी रविंद्र जोशी ,तलाठी वास्ते व ग्रामसेवक रफीक तांबोळी यांनी काम पाहिले. विहीत मुदतीत एकच अर्ज आल्याने सरपंच पदी सौ. प्रियंका गणेश पवार यांची बिनविरोध निवड जाहीर झाली असे सांगण्यात आले.
आ. प्रा .राम शिंदे यांच्या नेतृत्वात व सामाजिक कार्यकर्ते सचिन सर गायवळ व निलेशभाऊ गायवळ बंधु यांच्या खंबीर साथीने बावी ग्रामपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टिची सत्ता स्थापन केली! आ.प्रा राम शिंदे यांचे विश्वासु युवा नेते ,युवा मोर्चा ता उपाध्यक्ष राम पवार यांची भावजयी सौ. प्रियंका गणेश पवार यांची बावी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांची गुलालाने उधळण व फटाक्यांच्या आतिषबाजीने स्वागत करण्यात आले. त्यांच्या निवडी बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
सरपंचपदीच्या निवडी दरम्यान जामखेड बाजार समिती माजी संचालक ॲड कालिदास पवार, केशव मुरुमकर उद्दव पवार, सुनिल चिकणे, गणेश पवार, शरद पवार, पप्पू निकम, मानिक जाधव, अनिल कारंडे, सिताराम पवार, अशोक बिरंगळ, नागेश बिरंगळ, बलभीम मुरुमकर सर, श्रीराम शेटे, सुरेश कारंडे, अमृत कारंडे, बंडु निकम, दिपक पवार, राजु रंधवे, शत्रुगण जगताप, बाबुशा मंडलिक, शहाजी कवादे, शेषराव कवादे, सुनिल पवार व विशाल मंडलिक यांनी विषेश सहकार्य व अभिनंदन केले.
यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल लोंखडे, पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ शेकडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
No comments:
Post a Comment