खर्डा (प्रतिनिधी) —19 ऑगस्ट2025
खर्डा गावातील सामाजिक कार्यकर्ते बबलू गोलेकर यांच्या नव्या घराच्या वास्तुशांती, मूर्ती प्रतिष्ठापना आणि गृहनिर्माण सोहळ्याचे उद्या, दिनांक २० ऑगस्ट २०२५ रोजी मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक कार्यक्रम सीताराम गडाच्या पायथ्याशी, रत्नसुरेश मंगल कार्यालय शेजारी, येडेश्वरी निवास येथे सकाळी ७ ते ९ वाजता सुरू होईल.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी सात ते नऊ वाजेदरम्यान वास्तुशांती पूजा व धार्मिक विधींनी होणार आहे. त्यानंतर सकाळी नऊ ते बारा वाजेच्या दरम्यान मूर्ती प्रतिष्ठापना केली जाणार आहे. दुपारी एक वाजता भाविकांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर आराधी गाणे जागर रात्री बारा ते पहाटे चार या वेळेत घेतले जाईल. दुपारी चार वाजता सुरू होणारी भव्य मिरवणूक रात्री नऊ वाजेपर्यंत गावात दिमाखात फिरवली जाणार आहे.
या वेळी महाराष्ट्राचे प्रख्यात महागायक चंदनजी कांबळे यांच्या सुगम संगीताच्या कार्यक्रमाचा भक्तांना आस्वाद घेता येणार आहे. तसेच परिसरातील अनेक मान्यवर, नातेवाईक, ग्रामस्थ आणि भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित रहातील अशी अपेक्षा आहे.गोलेकर कुटुंबाने हे आयोजन गावातील एकात्मता, सांस्कृतिक जाणीव आणि पारंपरिक श्रद्धेला चालना देण्यासाठी केले आहे. नवीन घराच्या वास्तुशांती व पूजा विधीमुळे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढेल, असे आयोजक बबलू गोलेकर यांनी सांगितले. या धार्मिक-सांस्कृतिक सोहळ्यास सर्व भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते बबलू गोलेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा