पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/१७फेब्रुवारी२०२५
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत जामखेड तालुक्यातील खर्डा गावात २० मुस्लीम मदारी कुटुंबियांच्या वसाहतीसाठी निधीस मंजूरी देण्यात आली. ३१ मार्च पर्यंत या कामाला गती देऊन वसाहतीचे काम पूर्ण करावे, असे निर्देश विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.
विधानपरिषद येथे मौजे खर्डा (ता. जामखेड) अहिल्यानगर जिल्ह्यातील यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत मदारी वसाहतीच्या कामासंदर्भात आढावा घेण्यात आला. त्यावेळी सभापती प्रा. राम शिंदे बोलत होते. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, इतर मागासवर्ग कल्याण विभागाचे संचालक ज्ञानेश्वर खिल्लारी, प्रादेशिक उपसंचालक भगवान वीर, सहाय्यक संचालक विनोद लोंढे, खर्डा ग्रामपंचायतीच्या सरपंच संजीवनी पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वैजीनाथ पाटील, माजी सभापती रवींद्र सुरवसे, ग्रामपंचायत सदस्य गणेश शिंदे, महालिंग कोरे, महेश दिंडोरे व खर्डा येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment