जामखेड तालुक्यातील पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या खर्डा येथे वर्षभरापूर्वी उभारण्यात आलेल्या सर्वात उंच भगवा ध्वज उभारण्याच्या माध्यमातून संपूर्ण देशातील सर्व धर्मीयांची पवित्र स्थळे व महत्त्वाची ऐतिहासिक ठिकाणे या ठिकाणी काढलेल्या स्वराज्य ध्वज यात्रेच्या माध्यमातून खर्डा शहराची देशभरात ओळख निर्माण केली. तसेच मराठ्यांच्या शेवटच्या विजयाचा साक्षीदार असलेल्या किल्ल्याचा गौरव वाढवला. या कामाचे उतरदायीत्व म्हणून खर्डा येथून प्रकाशित होणार व संपूर्ण महाराष्ट्रात जाणारे साप्ताहिक पोलीस वारंट या वृत्तपत्राच्या संपादिक श्वेता बापूसाहेब गायकवाड व कार्यकारी संपादक अशुतोष गायकवाड यांनी खर्डा किल्ला व स्वराज्य ध्वज असलेली संयुक्त प्रतिमा कर्जत जामखेडचे कार्यकुशल आमदार आ.रोहित पवार यांना सस्नेह भेट दिली.
तसेच खर्डा व परिसरातील विविध विषयांवर चर्चा केली.
तसेच खर्डा व परिसरातील विविध विषयांवर चर्चा केली.
आज दि. २४ सप्टेंबर रोजी खर्डा येथील खर्डा इंग्लिश स्कूल येथे आयोजित पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आ. रोहित पवार यांना ही अनोखी प्रतिमा देण्यात आली.
No comments:
Post a Comment