पोलीस वारंट न्युज नेटवर्क : २२ सप्टेंबर
जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस हवलदार संजय लाटे यांची बदली नुकतीच पारनेर पोलीस स्टेशन येथे झाली आहे.
त्या निमित्ताने जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने त्यांना समारंभपूर्वक निरोप देण्यात आला.
काल दि २१ रोजी दुपारी १ वाजताचे सुमारास जामखेड येथील उत्कर्ष हॉटेल येथे घेण्यात आलेल्या निरोप समारंभ कार्यक्रमावेळी पोलीस हवालदार संजय लाटे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन त्यांचा येथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्यावर प्रेम करणारे जवळील पोलीस मित्र कर्मचाऱ्यांच्या वतीने अत्यंत जड अंतकरणाने निरोप समारंभ देण्यात आला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक अनिलराव भारती, सहाय्यक उपनिरीक्षक यादव, पोलीस कॉन्स्टेबल संजय लोखंडे, पोलीस नाईक अजय साठे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन पिरगळ, पोलीस कॉन्स्टेबल दत्तू बेलेकर, सचिन देवढे, विजय सुपेकर, पाचपुते, वाहतूक कर्मचारी दिनेश गंगे, गणेश कळाणे, होमगार्ड पवार, विशाल ढवळे इत्यादी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
संजय लाटे हे जामखेड पोलीस स्टेशनला असताना त्यांचे कामकाज हे नेहमी चांगले राहिले आहे, त्यांनी अनेक गुन्ह्याच्या तपासात वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. तसेच सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनाही त्याचे वेळोवेळी मार्गदर्शन राहिलेले आहे.
No comments:
Post a Comment