पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२१सप्टेंबर
जामखेड तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुदानासाठी आ. प्रा.राम शिंदे यांच्यासोबत जामखेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे शिष्ट मंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पणन मंत्री ना. अब्दुल सत्तार यांची भेट घेऊन कांदा उत्पादकांना कांदा अनुदानापासून जे ३५०० शेतकरी वंचित राहिले आहेत. अशा शेतकऱ्यांना तातडीने कांदा अनुदान मिळावं यासाठी सर्व वस्तुस्थिती समजावून सांगून सदर कांदा अनुदान प्रकरणी आपण स्वतः लक्ष देऊन जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी केली. त्याला प्रतिसाद देत पणन मंत्री सत्तार यांनी तातडीने पणन उपसंचालक, अहमदनगर जिल्हाधिकारी यांना आदेश देऊन जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही याची काळजी घेऊन कांदा अनुदानात अपात्र झालेल्यां शेतकऱ्यांच्या आर्जांची फेर तपासणी करावी असे आदेश दिले.
याबरोबरच आ. राम शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जामखेड तालुक्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थितीची माहिती देऊन, त्यावर उपाययोजना करण्यासाठी जामखेड तालुक्यामध्ये चारा छावण्या, पाण्याचे टँकर, पीक विमा ईत्यादि बाबत चर्चा केली. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासित केले की, दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री म्हणून मी कर्जत जामखेड मधील जनतेच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे मतदारसंघांमध्ये कसल्याही निधी कमी पडू दिला जाणार नाही.
यावेळी आ. राम शिंदे यांच्या समवेत जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, संचालक सचिन घुमरे, अंकुश ढवळे, राहुल बेदमुथा, नंदकुमार गोरे, डॉ. गणेश जगताप, सुरेश पवार, बबन हुलगुंडे व कांदा उत्पादक शेतकरी शेतकरी आवर्जून उपस्थित होते.
No comments:
Post a Comment