पोलीस वारंट न्यूज नेटवर्क-२५ जानेवारी
ऐतिहासिक व धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचे असणारे खर्डा हे गाव असून आज खर्डा येथे भव्य दिव्य असे प्रभू श्रीराम मंदिर उभारणीचा पायाभरणीचे काम आज पासून चालू झाले असून या कार्यक्रमाची पूजन श्री सिताराम गडाचे मठाधिपती महालिंग महाराज नगरे व बालयोगी ब्रह्मऋषी महात्यागी अवधूत चिंतन सद्गुरू संन्यासी पागल बाबा यांच्या हस्ते करण्यात आले आहे .
यावेळी खर्डा व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी हजेरी लावली सर्व परिसरात जय श्रीराम च्या घोषणा देण्यात आल्या खर्डा शहरात भगवे पत्ताके लावून रांगोळी काढून पाया भरण्याची सुरुवात झाली हे श्रीराम मंदिर लोकवर्गणीतून बांधण्यात येणार आहे .त्यामुळे खर्डा व परिसरातील नागिरकांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण पसरले आहे
यावेळी बालयोगी ब्रह्मऋषी महात्यागी अवधूत चिंतन सद्गुरू संन्यासी पागल बाबा म्हणाले राम नावावर विश्वास ठेवून संकल्प हाती घेतला तर त्याला तारुण नेण्याची शक्ती भगवंत मनुष्य जीवाला असतो. आजपर्यंत अनेक मंदिरे उभी करताना याची प्रचिती अनुभवली आहे. मनात राम कार्यात राम व रामा वर निष्ठा ठेवून आपले कार्य करत राहिल्यास जीवन सार्थक होते. असे मत महंत योगी बाली योगी ब्रह्मऋषी महा त्यागी अवधूतचिंतन सद्गुरू संन्यासी बाबा यांनी व्यक्त केले.
आज दि. २५ जानेवारी रोजी खर्डा येथील श्री. मारुती मंदिरासमोर कसबा गल्ली येथे सकाळी ११ वाजता
भव्य दिव्य प्रभू श्रीराम मंदिराचा पाया श्री सिताराम गडाचे मठाधिपती महालिंग महाराज नगरे व बालयोगी अवधूत चिंतन सद्गुरू संन्यासी पागल बाबा यांच्या हस्ते भरण्यात आला असून यावेळी खर्डा व खर्डा पंचक्रोशीतील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पायाभरणीच्या कार्यक्रम संपन्न झाला आहे .
यावेळी उपस्थित ह.भ.प. महालिंग महाराज नगरे , हभप.संपत जायभाय महाराज , हभप.संन्याशी पागल बाबा तसेच भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र सुरवसे, बाजार समिती संचालक वैजीनाथ पाटील, माजी सरपंच संजय गोपाळघरे, माजी उपसरपंच श्रीकांत लोखंडे, सुनील साळुंखे, गणेश सूळ ,आकाश गुरसाळी ,विकास शिंदे,शीतल शिंदे, रामदादा भोसले, सर्व राजकीय , सामाजिक , क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्ते खर्डा पंचक्रोशीतील नागरीक, महिला , युवक, भाविकभक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
No comments:
Post a Comment