पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/१७ एप्रिल
जामखेड तालुक्यातील साकत ग्रामपंचायत हद्दीतील येथील पाणीपुरवठा पिंपळवाडी शासकीय तिव्र उन्हाळ्यात बंद होता. हा पाणीपरवठा सुरळीत करण्यौसाठी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य भटके विमुक्त समन्वयक अॅड.. डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली पिंपळवाडी ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने जामखेड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अधिका प्रकाश पोळ यांची भेट घेतली व पाणी टंचाईमुळे पिंपळवाडी ग्रामस्थांना होणारा त्रास याबाबूत वस्तूस्थिती समोर मांड़ली. त्यामुळे शिष्ट मंडळ भेटताच गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्याकडून सूदर कामाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. यामुळे पिंपळवाडी ग्रामस्थांचा अनेक दिवसांपासून रखडलेला पाणी प्रश्न ऐरणीवर आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जामखेड साकत ग्रामपंचायत हद्दीतील पिंपळवाडी गावातील जलजीवन योजनेच्या ठेकेदारांनी जुनी पाण्याची पाईपलाईन तोडून नवीन पाईपलाईन टाकली मात्र त्यावरून नळ कनेक्शन न दिल्याने पाणीपुरवठा बंद आहे. नळ कलेक्शन जोडून हा पाणीपुरवठा सुरळीत करावा, तसेच हनुमान मंदिरा समोरील ब्लॉक व शेजारच्या गल्लीतील काँक्रीटचा रस्ता तोडून ब्लॉक व रस्ता नादुरुस्त केला आहे.तीही कामे करावीत या सर्व मागण्यांसाठी काल दि.१६ एप्रिल रोजी शिष्टमंडळ
गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांना भेटले. यावेळी उपस्थित वंचित बहुजनआघाडीचे शहराध्यक्ष अजिनाथ शिंदे,विशाल नेमाने, लक्ष्मण घोलप, विजयघोलप, प्रकाश टेकाळे, बबन नेमाने,जालिंदर फुलवले व इतर गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment