पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/१२ जून
जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील नायगाव येथील अल्पवयीन मुलीवर बळजबरीने व वेळोवेळी शारीरिक संबंध ठेऊन तिला जिवे मारण्याची धमकी दिले प्रकरणी
नायगाव येथील राजेश बबन उगले, बाळासाहेब काशिनाथ लेंडे रा. नायगाव ता. जामखेड या दोन आरोपींविरुद्ध खर्डा पोलीस स्टेशनला भा.द.वी.कलम ३७६ नुसार बलात्काराचा तसेच बालकांचे लैंगिक अपराध पासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४ व ६ प्रमाणे तसेच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील आरोपी राजेश बबन उगले यास अटक करण्यात आली असून त्यास १० जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. तसेच दुसरा आरोपी बाळासाहेब काशीनाथ लेंडे या आरोपीसही दि. ९ जून रोजी अटक केली आहे. माहे जून २०२३ ते २८ /३ / २०२४ या कालावधीत आरोपीने नायगाव येथील अल्पवयीन मुलीवर तिच्या मना विरूद्ध बळजबरीने, धमकी देऊन इच्छा नसताना शारीरिक संबंध केले आहेत. अशी फिर्याद पीडितेच्या आईने खर्डा पोलीस स्टेशनला दिली आहे.
या गुन्ह्याचा तपास खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांचे मार्गदर्शनाखाली पो. हेड.कॉन्स्टेबल संभाजी शेंडे,पो. कॉन्स्टेबल शशिकांत म्हस्के,पो. कॉ.बाळू खाडे,पो. कॉ. अशोक बडे करत आहेत .
No comments:
Post a Comment