पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/१२जून
जामखेड शहरातील आरोळे वस्ती येथील एका किराणा दुकानासमोर दुध घालुन घरी जात असताना यातील जखमी तरूणास आडवुन त्याच्यावर अचानक हल्ला करत कोयत्याने सपासप वार करून गंभीर जखमी केल्याने परिसरात मोठी दहशत पसरली होती. या प्रकरणी चार जणांनविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून चारही हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केले आहे. हल्ल्याचे कारण मात्र अद्याप समजु शकले नाही.
या बाबत सविस्तर अस की, यातील फिर्यादी अशोक रतन म्हस्के (वय २३ वर्षे) रा. कोल्हेवस्ती, जामखेड हा सोमवार दि. १० रोजी सायंकाळी जामखेड शहरात डेअरी मध्ये दुध घालुन मोटारसायकल वरुन आपल्या कोल्हे वस्ती येथे घरी चालला होता. यानंतर रात्री ९:०० वाजण्याच्या सुमारास आरोळे वस्ती येथील एका कीराणा दुकाना समोर यातील आरोपी प्रमोद प्रविण घायतडक रा. कोल्हेवस्ती, सलमान आत्तार (पुर्ण नाव माहीत नाही), रोहित शिवाजी गायकवाड व चॉंद नुर उर्फ आयन शेख तिघे रा. जामखेड यांनी फिर्यादी अशोक म्हस्के याची मोटारसायकल आडवुन गाडीची चावी काढुन घेतली. यावेळी फिर्यादीने विचारले की, मला का थांबवले आहे. आसे म्हणताच आरोपी प्रमोद घायतडक त्यास म्हणाला की, तु येता जाता माझ्याकडे नेहमी खुन्नस ने का बघत असतो. आज तुझी मस्ती जिरवतो. असे म्हणुन त्याच्या दोन्ही हातावर कोयत्याने वार केले तर आरोपी नंबर दोन याने हातातील त्याच्या हातातील चाकूने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या कंबरेत चाकुने वार केले तर आरोपी नंबर तीन व चार यांनी त्यांच्या हातातील काठ्यांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात आशोक मस्के हा गंभीर जखमी झाला आसुन त्याच्यावर जामखेड येथील समर्थ हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकारामुळे जामखेड शहरात मोठी दहशत पसरली असून शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे शहरातील सर्वसामान्य जनता भयभीत झाली आहे.
यातील चारही आरोपींवर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून जामखेड पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षिका वर्षा जाधव, हेडकॉन्टेबल प्रविण इंगळे, सरोदे, कोपनर, मंडगे, घोळवे
पळसे यांच्या पथकाने तात्काळ आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि वर्षा जाधव या करत आहेत.
No comments:
Post a Comment