पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/८सप्टेंबर
व्याजाने घेतलेल्या पैशांची परतफेड केली असतानाही आवास्थव व्याजाची मागणी करू लागल्याने कोरे चेक घेणार्या सावकारावर खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी फिर्यादी बाजीराव मोहन बहादुरे राहणार तेलंगशी तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर यांनी खर्डा पोलीस स्टेशनला गुरनं 142/2024 भारतीय न्याय संहिता 2023चे कलम 308(1)351,352,(2)352(3) सह महाराष्ट्र सावकार अधिनियम 2014चे कलम39 प्रमाणे त्यानुसार पोलिसांनी अशोक रामहरी सुरवसे रा.धामणगाव ता.जामखेड याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांना पैशांची गरज असल्याने त्यांनी अशोकराव रामहरी सुरवसे याच्याकडून 3%व्याजाने 1लाख रुपये घेतले होते. त्या बदल्यात त्याचे व्याज 40,500/रुपये दिले परंतु यातील सावकार आरोपी अशोक सुरवसे याने 3% ऐवजी 4 % दराने आवास्तव व्याजाचे पैशाचे मागणी सुरू केली त्यानंतर यातील सावकाराणे फिर्यादी कडून घेतलेले ब्लॅंक चेकचा वापर करून त्यावर एक लाख 35 हजार रुपये अशी रक्कम टाकून यातील फिर्यादीने घराचा हप्ता भरण्यासाठी ठेवलेले पैसे आरोपीने परस्पर काढून घेऊन आणखी आवास्थव व्याजाचे मागणी करू लागल्याने व छळ करून
त्रास देऊ लागल्याने घाबरून यातील फिर्यादी व त्यांची पत्नी यांनी खर्डा पोलीस स्टेशनला धाव घेतली.
सदर कारवाई अहमदनगर पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे कर्जत, यांचे मार्गदर्शनाखाली खर्डा पोलिसांनी कामगिरी केली आहे.
No comments:
Post a Comment