पोलीस वारंट न्यूज नेटवर्क/१० सप्टेंबर
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात सध्या धामधूम पाहायला मिळत आहे. यंदाची निवडणूक मुख्यत्वे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी रंगणार आहे.
अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यासंदर्भात 'एक्स' खात्यावर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. राज्यात लक्षवेधी होणाऱ्या निवडणुकींपैकी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाची होणार, असे दिसते आहे.
रोहित पवारांनी केलेल्या ट्विटमध्ये कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाविषयी, असं म्हटलं आहे की, 'कुछ भी कर के, अभी उसे वही पे रोको', असं सांगितल्याने कर्जत-जामखेडची लढत राज्यात सर्वाधिक लक्षवेधी आणि तेवढीच इंटेरेस्टिंग होणार, हे नक्की आहे. पण मीही या महाकाय शक्तीसोबत दोन हात करायला सज्ज आहे. या महायुद्धात कर्जत-जामखेडकर स्वाभिमान आणि निष्ठा काय असते, ते या महाकायशक्तीला दाखवून देतील, असे विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला आहे.
आमदार रोहित पवारांनी एका इंटरनॅशल स्रोतचा उल्लेख करत भाजपने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केलेल्या अंतर्गत सर्व्हेवरून महायुतीवर उपरोधिक कोपरखळ्या लगावल्या. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 7-11, शिवसेना एकनाथ शिंदे गटाला 17-22 आणि भाजपला 62-67 जागा मिळून लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज आहे. या सर्व्हेमुळे भाजपच्या अंतर्गत गोटात भीती पसरलीय. यातून केंद्रीय स्तरावरून अनेक हालचाली महाराष्ट्रात सुरू झाल्याकडे आमदार रोहित पवारांनी लक्ष वेधले.
No comments:
Post a Comment