खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील आनंदवाडी येथे चोरट्याने घराचे कुलुप तोडून चोरी केल्याची घटना घडली मंगळवार दि.२१ जानेवारी२०२५ रोजी घडली असून , घरामध्ये कोणी नसताना चोराने घराचे कुलूप तोडून घरफोडी केल्याची घटना खर्डा हद्दीत घडली आहे. याबाबत खर्डा पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी गणेश शाहु खाडे वय ३३वर्ष धंदा शेती रा.आनंदवाडी ता.जामखेड .जि. अहिल्यानगर यांनी खर्डा पोलीस स्टेशनला दि.२२जानेवारी २०२५ रोजी गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी गणेश खाडे यांनी फिर्यादीत म्हंटले आहे की दि २१/०१/२०२५ रोजी रात्री ८ ते१० वाजेच्या सुमारास घराला कुलुप लावून माझी पत्नी क्रांती व आई मंगल असे आम्ही लोणी फाटा ता.जामखेड येथे संत भगवान बाबा व संत वामनभाऊ यांचे पुण्यतिथी निमित्त असलेल्या कीर्तनासाठी गेलो होतो. रात्री 10 वाजेच्या सुमारास मी कीर्तन एकूण मी माझा मित्र विजय पोपट घुगे राहणार आनंदवाडी ता.जामखेड याचे मोटारसायकलवर बसून माझे घरी आलो तेव्हा मी माझी पत्नी व आई यांना फोन करून बोलावून घेतले.त्यानंतर घरामध्ये जाऊन पाहिले असता घरातील कपाट उघडे व कपाटातील सामानाची उचकपाचक करून अस्ताव्यस्थ पडलेले दिसले तेव्हा माझी पत्नी म्हणाली माझे कपाटामध्ये ठेवलेले सोन्याचे गंठण दिसत नाही तेव्हा आमची खात्री पटली की कोणतीरी अज्ञात चोरट्याने तुमच्या घराचे कुलूप तोडून आत मध्ये प्रवेश करून कपाट उघडून त्यामध्ये ठेवलेल्या सोन्याचे गंठण चोरी करून नेले आहे चोरीस गेलेला सोन्याच्या गंठण वर्णन खालील प्रमाणे 45 हजार रुपये किमतीचा सोन्याचा गंठण त्यात दहा ग्रॅमचे मनी व पाच ग्रॅम च्या पळ्या असलेला असा एकूण 45,000 रु ची चोरी झाली आहे यायबाबत खर्डा पोलीस स्टेशनला दि २२ जानेवारी २०२५ रोजी अज्ञात चोरट्या विरुद्ध फिर्यादी गणेश शाहू खाडे यांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे . पुढील तपास खर्डा पोलीस करत आहेत.
No comments:
Post a Comment