पोलीस वारंट न्युज नेटवर्क : १३ मार्च
जामखेड तालुक्यातील रत्नापूर येथील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीस मी तुला एक वर्षापासुन बघत असुन, मी तुला चांगले ओळखतो. तु मला खुप आवडतेस. मी तुझ्यावर प्रेम करतो. मला तुझ्याशी अफेअर करायचे आहे. तु मला ॲक्सेप्ट कर असे म्हणत असताना अल्पवयीन पिडीत फिर्यादीने त्यावर नकार दिला असता, आरोपी म्हणाला की, तुला माहित आहे का मी कोणाचा माणूस आहे. मी तुला व तुझ्या घरच्यांना जिवे मारुन टाकीन तु मला ॲक्सेप्ट कर व माझेसोबत प्रेम कर. असे वारंवार म्हणुन दम देवुन निघुन गेला. यानुसार १६ वर्षीय अल्पवयीन पिडितेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी कैफ अमजद कुरेशी रा. खर्डा रोड, जामखेड याचे विरुध्द छेडछाड करणे व प्रेमाची मागणी करणे तसेच दम देणे प्रकरणी भा.द.वि.क. 354, 354 (अ), 354 (ड) बालकांचे लैंगिक अपराध सरंक्षण अधिनियम कलम 12 प्रमाणे.गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी कैफ अमजद कुरेशी यास अटक करण्यात आली आहे.
ही घटना जामखेड शहरातील एका विद्यालयाच्या मैदानावर दि. दि. २ मार्च रोजीचे सकाळी १०:३० ते दि.१३ मार्च २०२३ रोजीचे सकाळी १०:१० वाजताचे सुमारास तसेच फिर्यादीत नमुद केलेल्या तारखेस वेळी घडली आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे हे करत असून पोलीस उपनिरीक्षक अनिलराव भारती, पोलीस नाईक अजय साठे, संग्राम जाधव, पोलीस कॉन्स्टेबल आसाराम आवारे ,अरुण पवार, संदीप आजबे यांनी मदत केली.
No comments:
Post a Comment