पोलीस वारंट न्युज नेटवर्क : १३ मार्च
जामखेड पोलीसांकडून दारूची अवैध वाहतूकी विरूद्ध आणखी एक कारवाई जामखेड बीड रोडवरील एका पेट्रोल पंपाच्या समोर देशी विदेशी दारु घेऊन जाणाऱ्या एका इसमास स्कुटरवरून गोणीमध्ये दारूचे बाॅक्स जात असताना घेतले ताब्यात या आठवडय़ातील ही याच प्रकारची दुसरी कारवाई आहे.
याबाबत पोलीस काॅन्स्टेबल प्रविण कारभारी पालवे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, काल दि. १२ मार्च रोजी ११.०० वाजताचे सुमारास मी पोलीस हेडकॉन्टेबल संजय लोखंडे, पोलीस नाईक अजय साठे, पोलीस काॅन्स्टेबल सतिष दळवी असे जामखेड पोलीस स्टेशन येथे असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडे यांनी आम्हा सर्वांना त्यांचे कार्यालयात बोलावुन सांगीतले की, आत्ताच गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली कि, एक इसम हा त्याचे स्कुटरवर जामखेड-बीड रोडने नवले पेट्रोल पंप जामखेड येथे अवैध दारूची वाहतुक करीत आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाली आहे असे सांगुन, तुम्ही सदर ठिकाणी जावून कारवाई करावी असा तोंडी आदेश दिल्याने सदर ठिकाणी जाऊन पोहचलो असता एक इसम त्याचे स्कुटरवर गोणीमध्ये बाॅक्स घेवून जात असताना दिसला त्याचे स्कुटरवरील बॉक्स तपासले असता त्याच्या जवळ देशी व विदेशी दारूच्या सिलबंद बाटल्या मिळून आल्या. त्यावेळी त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव संभाजी रंगनाथ नरवडे वय ४० वर्ष स. सुपा ता. पाटोदा जि. बीड असे सांगीतले.
त्याचे कडील मालाची पाहाणी करून झडती घेतली असता खालील वर्णनाचा माल आढळला.
१) ३८४० रूपये किमतीच्या मॅगडॉल व्हिस्की नंबर १ कंपनीच्या प्रत्येकी १८० मि.ली.च्याप्रत्येकी १६० रु. किमतीच्या २४ सिलबंद बाटल्या.
२) १३०८ रूपये किमतीच्या ब्रॅन्ड मास्टर होडका कंपनीच्या प्रत्येकी १८० मि.ली. प्रत्येकी २१८ रु. किंमतीच्या. दारुच्या ६ सिलबंद बाटल्या
३) ३७०००रूपये किमतीच्या देशी बॉबी संत्रा कंपनीच्या प्रत्येकी ९० मि.ली. च्या प्रत्येकी ३५ रु. किंमतीच्या दारच्या
२०० सिलबंद बाटल्या
४) ३५,०००/- रु.कि.ची अटोव्हा कंपनीची लाल रंगाची स्कुटर नं. एम एच २३ ए क्यू १२३० असलेली
असा एकुण ४८,१४८ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
यानुसार संभाजी रंगनाथ नरवडे (वय ४०) याचे कब्जात वहातुक करताना मिळुन आल्याने पोहेका एस. डी. लोखंडे यांनी सदर मुदेदमाल पंचासमक्ष जागीच पंचनामा करून जप्त करुन जप्त मालातून प्रत्येको एक सिलबंद बाटली सैम्पल म्हणून केमीकल तपासणी साठी राखून ठेवून त्या बाटलीस पोलीसांचे व पंचाचे सह्याचे कागदी लेबल जागीच लावले व जात मुद्देमाल व सदर इसम ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला आणले. यानुसार फिर्यादी पोलीस काॅन्स्टेबल प्रविण कारभारी पालवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संभाजी रंगनाथ नरवडे वय ४० वर्ष रा. सुपा ता.पाटोदा जि.बीड विरूद्ध महाराष्ट्र प्रोव्हिशन कायदा कलम ६५ (ई). (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस नाईक अजय साठे यांना या बाबतची बातमी मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक महेश पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक बडे यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीसांनी हा छापा टाकला. असून या छापा पथकात पोलीस हेडकॉन्टेबल संजय लोखंडे, पोलीस नाईक अजय साठे, पोलीस काॅन्स्टेबल सतिष दळवी व प्रविण पालवे यांचा समावेश होता. या गुन्ह्याचा
पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय लोखंडे करत आहेत.
दरम्यान जामखेड पोलीस स्टेशन येथे नव्याने रुजु झालेले पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना गुप्त माहीतीदारामार्फत माहीती मिळाली की, जामखेड शहरातुन साकतकडे एक इसम हा देशी विदेशी दारुची विक्री करण्याची बुलेटवरून चोरुन विना परवाना वाहतुक करत आहे, आत्ता गेल्यास सदर इसम हा मुद्देमालासह मिळुन येईल. अशी बातमी मिळाल्याने त्यांनी लगेचच जामखेड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक रवाना करुन सदरची बुलेट मार्केट यार्ड येथे येताच पथकाने सापळा रचुन सदर इसमास अडवुन त्याची झडती घेतली असता त्याचेकडे एकुण १६०४० /- रु. किमतीच्या देशी विदेशी दारुच्या बाटल्या व ८०,००० /- रु. किंमतीची बुलेट मोटारसायकल असा एकुण ९६०४० /- रु. मिळुन आल्याने त्यास मुद्देमालासह ताब्यात घेतले होते. यानुसार पोकॉ. विजय कोळी यांच्या फिर्यादीवरुन सदर इसम आरोपी - विनोद शहाजी इंगळे (वय २९) रा. हापटेवाडी ता. जामखेड याचे विरुध्द मुंबई दारुबंदी अधिनियमान्वये जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment