पोलीस वारंट न्युज नेटवर्क : १३ मार्च
खर्डा पोलीस स्टेशनचा नव्याने पदभार घेतलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर यांनी खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या असून त्याबाबत नियोजन करत असतानाच हाती आलेल्या गुप्त माहितीवरून तातडीने पावले उचलत खर्डा शहरातील कोष्टगल्ली येथे गावठी हातभट्टीटीची दारू तयार करून विकणाऱ्या महिलेच्या अड्ड्यावर छापा टाकून गावठी हातभट्टीचा मोठा दारूचा साठा नष्ट केला.
ही कारवाई स्वतः सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर व पोलीस नाईक संभाजी शेंडे, पोलीस काॅन्स्टेबल शशी म्हस्के,अशोक बडे यांच्या पथकाने केली आहे.
खर्डा शहरातील कोष्टी गल्लीत गावठी हातभट्टीचा अड्डा चालवणाऱ्या महिलेविरूध्द पोलीस काॅन्स्टेबल शशी म्हस्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खर्डा पोलीस स्टेशनचा नव्याने पदभार घेतल्यानंतर पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांना सुरक्षा पुरविण्याबरोबरच गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्यासाठी सपोनि महेश जानकर यांनी हद्दीतील अवैध धंद्यावर कारवाई करण्याकडे आपला मोर्चा वळविला असून काल केलेल्या कारवाईमुळे अवैध धंदे करणारांचे धाबे दणाणले आहेत.
No comments:
Post a Comment