पोलीस वारंट न्यूज नेटवर्क : ११मार्च
जामखेड तालुक्यातील खर्डा येथे ११ मार्च १७९५झालेल्या मराठे निजाम या लढाईला आज दि. ११ मार्च रोजी २२८ वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने किल्ले शिवपट्टण येथे तालुका प्रमुख पांडुराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी ११मार्च रोजी मराठा शौर्यदिन साजरा केला जातो.
या वर्षी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान किल्ले शिवपट्टण येथील धारकरी शिवभक्त यांच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छ. शिवाजी महाराजांच्या मुर्तीचे पुजन सामाजिक कार्यकर्ते योगेश सुरवसे, विवेक योगे व शिवप्रतिष्ठानचे धारकरी संकेत सातपुते यांच्या हस्ते ध्येय मंत्र घेऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली.
यावेळी बोलताना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी बबलु निकम म्हणाले कि, दि. ११ मार्च १७९५ रोजी खर्डा येथे झालेली लढाई ही मराठ्यांच्या इतिहासातील सर्व अठरापगड मराठा सरदारांनी एकजुटीने लढलेली ऐतिहासिक लढाई होती.
हैदराबादच्या निजामांचा मंत्री मशीर मुल्क याने मराठ्यांचा चौथाई वसुल नाकारल्याने व मराठा सरदारांच्या केलेल्या अपमानामुळे सवाई माधवराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली दौलतराव शिंदे, तुकोजीराव होळकर, रघुजी भोसले या मराठा सरदारांनी निजामाच्या फौजांना खर्डा येथील रणटेकडीवर पराभुत केले.
तसेच पानिपत संग्रामानंतर ज्या लढाईने अठरापगड मराठ्यांच्या बाहुत स्फुरण चढले ती लढाई म्हणजे दि. ११ मार्च १७९५ रोजी लढलेली खर्ड्याची ऐतिहासिक लढाई होय. तसेच आम्ही हे कार्यक्रम आ. श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या प्रेरणेने करत असल्याचे ते यावेळी म्हणाले.
यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी अनिकेत सातपुते, पप्पू योगे, सुदेश दाहीतोंडे, संग्राम पाटील, निल पानगावकर, सौरभ देशमुख, गोपाल पाटील तुषार थोरात यांच्यासह शिवभक्त उपस्थित होते.
शेवटी ध्येयमंत्राने या कार्यक्रमाची सांगता झाली.
No comments:
Post a Comment