पोलीस वारंट न्युज नेटवर्क : ११ मार्च
खर्डा परिसरातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या हरभरा पिकासाठी हमीभाव मिळावा यासाठी शासनाच्या वतीने नाफेडच्या माध्यमातून हमीभाव केंद्र सुरू करण्यात आले आहे.
दि. ०१/०३/२०२३ पासुन नोंदणी सुरू झाली असून शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन केंद्र संचालक रवींद्र सुरवसे व कांतीलाल खिवंसरा यांनी केले आहे.
नाफेड, नवी दिल्ली व महाकिसान संघ कृषी प्रोड्यूसर कं.लि.यांच्या संयुक्त विद्यमाने हमीभाव योजने अंतर्गत (PSS) खर्डा येथील खर्डा फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि. खर्डा यांच्या वतीने खर्डा येथे शासकीय हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असुन या ऑनलाईन नोंदणी केंद्रावर जाऊन शेतकऱ्यांनी आपल्या हरभरा पिकाची नोंद करावी.
ऑनलाईन नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्र
१) ७/१२ उतारा (इ. पीक नोंदणी)
२) तलाठी यांचा ऑनलाईन पिक पेरा नोंद असलेला उतारा आवश्यक.
३) आधारकार्ड झेरॉक्स प्रत
४) बँक पासबुक स्पष्ट झेरॉक्स प्रत (बँक IFSC कोड व ब्रॅन्च कोड असणे आवश्यक)
जनधन चे खाते चालणार नाही
५) आधारकार्ड बँक खात्याला लिंक करणे अत्यंत महत्वाचे आहे.
६) मोबाईल नंबर
हरभरा हमीभाव : ५३३५/ रुपये (प्रति क्विंटल)
खरेदी संबंधी इतर माहिती खरेदी केंद्रावर उपलब्ध होईल.
तरी शेतकऱ्यांनी आपल्या हरभरा पिकांची आॅनलाईन नोंदणी करावी असे आवाहन केंद्र संचालक रवींद्र (दादा ) सुरवसे मो. ९७६६६२१८१८ व कांतीलालशेठ खिंवसरा मो.९४२२१९३३३३ यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment