पोलीस वारंट न्यूज नेटवर्क -११मार्च
नुकतीच कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. काल अर्थसंकल्पीय भाषणामध्ये थोर व्यक्तींच्या जन्मभूमीच्या बाबतीत बोलत असताना अनावधानाने पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचा उल्लेख अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राहिला होता तो उल्लेख महापुरुषांच्या जन्मभूमीच्या विकासाच्या बाबतीत जेव्हा ते उत्तर देतील त्या उत्तरात ते सकारात्मक राहतील असा विश्वास व्यक्त करत चौंडी या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळासाठी मोठ्या प्रमाणात निधी द्यावा, अशी मागणी यावेळी आमदार रोहित पवार यांनी केली तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात जो निधी देण्यात आलेला आहे त्यावर असलेली स्थगिती देखील उठवण्यात यावी अशी विनंती उपमुख्यमंत्री महोदयांना भेटून त्यांनी केली आहे.
गुरुवारी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याचा २०२३-२०२४ चा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी संतांचा उल्लेख आपल्या भाषणातून केला. यालाच अनुसरून आमदार रोहित पवार यांनी आपल्या मतदारसंघात महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात निधी संत श्री सद्गुरू गोदड महाराज, सिताराम बाबा व गीते बाबा यांच्या समाधीस्थळ विकासासाठी देण्यात आला आहे. परंतु त्यापैकी काही विकास निधीवर सध्या सरकारने लावलेली स्थगिती उठवावी अशी मागणी उपमुख्यमंत्र्यांकडे केली.
मतदारसंघाच्या विकासासाठी आमदार रोहित पवार हे कायमच कटिबद्ध असतात. त्यानुसारच त्यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अष्टविनायकांपैकी एक असलेल्या सिद्धटेक येथील गणपती मंदिर व राशीन येथील जगदंबा मंदिर ह्या देवस्थान विकासासाठी तसेच खर्डा किल्ल्याच्या विकासासाठी विकासाचे मोठे प्रस्ताव महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्रालयापर्यंत आणून ठेवले होते परंतु सरकार बदलल्यानंतर त्या बाबतीत कोणतीही कार्यवाही झालेली नाही तर त्याला मान्यता द्यावी अशी विनंती यावेळी आमदार रोहित पवार यांनी केली आहे जेणेकरून आध्यात्मिक, धार्मिक आणि शक्तीपीठ यांना एक एक नवी दिशा आणि ताकद या माध्यमातून देता येईल.
No comments:
Post a Comment